AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chhagan Bhujbal | ‘…तर, मी धर्म विरोधी ठरलो असतो’, कुठल्या विषयावर छगन भुजबळ म्हणाले?

Chhagan Bhujbal | मराठा आरक्षण, वाघनखं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच चिन्ह यावर राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. वाघ नखांच्या मुद्यावर छगन भुजबळ यांनी काय सांगितलं?

Chhagan Bhujbal | '...तर, मी धर्म विरोधी ठरलो असतो', कुठल्या विषयावर छगन भुजबळ म्हणाले?
chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2023 | 12:07 PM
Share

नाशिक (चंदन पूजाधिकारी) : “मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी माझा विरोध नाहीय. . ओबीसी समाजाला आरक्षण खूप कमी आहे. त्यामुळे त्यांना वेगळे आरक्षण द्या असे माझं म्हण आहे, आणि हे मत माझं एकट्याचे नाही इतर अनेक नेत्यांचे हेच मत आहे. त्यांचे नाव घेऊन जरांगे का बोलत नाही?. मला एकट्याला टार्गेट करण्यापेक्षा सगळ्यांना बोला नाहीतर त्याला राजकीय वास येईल” असं छगन भुजबळ म्हणाले. ब्रिटनमधून वाघनखं आणली जाणार आहेत, त्यावरही छगन भुजबळ यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, “लंडनमध्ये असलेल्या वाघ नखांच काहीतरी महत्त्व असेल, ते आल्यावर बघू”

राष्ट्रवादी काँग्रेसच चिन्ह आणि पक्षाबद्दलही त्यांना विचारण्यात आलं. “कायदेशीर बाबी आहेत, यात आमचे नेते देखील लक्ष घालत आहेत” असं छगन भुजबळ म्हणाले. “मी सुरुवातीपासून कांदा व्यापाऱ्यांना लिलाव सुरू करण्याचे आव्हान करत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी पहावे. आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न केले आहेत. व्यापाऱ्यांनी आता जास्त हट्ट करणे योग्य नाही. सरकारच्या कामात कोणी अडथळे आणत असतील तर पोलीस कारवाई करतील” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. डीजे, लेझर शो बद्दल भुजबळ काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी सण-उत्सवांच्या मिरवणुकीत वाजवल्या जाणाऱ्या डीजे, डॉल्बीच्या दणदणाटावर भाष्य केलय. मी लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार असल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता छगन भुजबळ यांनी सुद्धा डीजे, लेझर शो बद्दल भाष्य केलय. “मी आधी या विषयावर बोललो असतो, तर धर्म विरोधी आहे असे आरोप झाले असते. लेझर आणि डिजेमुळे अनेकांना त्रास झाले आहेत. लोकांना जर इजा होत असेल, तर सर्वांनी याचा विचार करायला पाहिजे” असं छगन भुजबळ म्हणाले.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच