वाघ हा वाघ असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर वाघाचे राज्य: संजय राऊत

| Updated on: Jun 11, 2021 | 6:51 PM

मैत्री कोणाशी करायचे हे वाघ ठरवतो. वाघ हा वाघ असतो.मग तो पिंजऱ्यातला असो किंवा जंगलातला. महाराष्ट्रावर वाघाचे राज्य आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

वाघ हा वाघ असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर वाघाचे राज्य: संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत
Follow us on

जळगाव: नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते तेव्हापासून भाजपची वाघाशी मैत्री होती. मैत्री कोणाशी करायचे हे वाघ ठरवतो. वाघ हा वाघ असतो.मग तो पिंजऱ्यातला असो किंवा जंगलातला. महाराष्ट्रावर वाघाचे राज्य आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी एक प्रकारे टोला लगावला आहे. ( Shivsena MP Sanjay Raut Said tiger is tiger Maharashtra ruled by Tiger)

गावतला शिवसैनिक काय करतोय हे पाहणं आमचं काम

राज्यात सत्ता असली तरी संघटनेला बळ देणे, गावातला शिवसैनिक काय करत आहे, हे प्रत्यक्ष जाऊन पाहणे हे आमच्यासारख्या नेत्यांचे कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार हा दौरा करत आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात संघटनेचे काम उत्तम प्रकारे सुरू आहे.

निवडणुका एकत्र लढाव्या लागतील

शरद पवार हे या सरकारचे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. त्यांनी सूतोवाच केले आहे, ती या राज्यातल्या जनतेच्या मनातली भावना आहे. निवडणुका या एकत्र लढाव्या लागतील. आजची राज्याची व्यवस्था अशीच पुढे न्यायची असेल तर पवार साहेब जे सांगत आहेत, त्यानुसार निवडणुका एकत्र लढून पुढे जावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसचा पंतप्रधान व्हायला हवा, आमचा पाठिंबा

नाना पटोले जर स्वबळावर निवडणुका लढत असतील तर त्यांचे स्वागत आहे. स्वबळावर लढून जर ते केंद्रात सत्ता आणणार असतील, मोदींना आव्हान उभे करत असतील तर त्यांचे स्वागत आहे. काँग्रेसचा पंतप्रधान व्हायला हवा, आमचा त्यांचा पाठींबा असेल, असंही संजय राऊत म्हणाले.

नाना पटोले यांच्याकडून प्रकाश आंबेडकरांशी आघाडीचे संकेत

नाना पटोले आज अकोल्यात आले होते. यावेळी मीडियाशी बोलताना पटोले यांनी हे मोठं विधान केलं. 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे, असं पटोले म्हणाले. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पटोले यांनी सांगितलं. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र, अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पटोले यांच्या या विधानामुळे राज्यात नव्या समीकरणाची नांदी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

संबंधित बातम्या:

प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार; नाना पटोलेंचं मोठं विधान

‘शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला दिलेली धमकी’, नारायण राणेंचा दावा

( Shivsena MP Sanjay Raut Said tiger is tiger Maharashtra ruled by Tiger)