Satyajeet Tambe: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेवरून तापले वातावरण, सत्यजीत तांबे यांना गिरीश महाजनांचा फोन, काय दिले आश्वासन?
Girish Mahajan Call to Satyajeet Tambe: पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेवरून वातावरण तापले आहे. सिन्नर तालुक्यात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याने वातावरण चिघळले. आंदोलकांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. जन आंदोलन आता थांबणार नसल्याचा तांबे यांनी दावा केला.

क्रांतीदिनीच पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी आंदोलन भडकले आहे. सिन्नर तालुक्यात मोठे जनआंदोलन उभे ठाकले आहे. या रेल्वेमार्गातील अहिल्यानगर वळणावरून वातावरण तापले आहे. सिन्नर तालुक्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावर आंदोलक आल्याने वाहनांचा मोठा खोळंबा झाला. नाशिक पुणे रेल्वे चक्काजाम आंदोलन आक्रमक संतप्त आंदोलकांचा समृद्धी महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. समृद्धी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांबच लांब रांगा आंदोलन जायचंय ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नाही. हा रेल्वे मार्ग सरळ व्हावा यासाठी सर्वच जण रस्त्यावर उतरल्याचे समोर आले आहे. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलनादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना फोन केला. दोघांमध्ये चर्चा झाली.
गिरीश महाजन यांनी केला फोन
काँग्रेस नेते आणि आमदार सत्यजित तांबे हे रेल्वे मार्ग सरळ व्हावा यासाठी रस्त्यावर उतरले. ते आंदोलकांसोबतच असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तांबे यांना मंत्री गिरीश महाजन यांचा फोन आला. फोन वरून महाजन यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी जन सुनावाई घेण्याची सत्यजित तांबे यांनी मागणी केली.
याविषयी लवकरच समिती गठीत करण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले. तेव्हा समितीने येत्या 60 दिवसात कोणत्याही परिस्थिती त्यांचा निकाल द्यावा. कमिटीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता जनभावनेचा पण विचार करावा. कमिटी तालुक्या तालुक्यात आणि गावागावात आली पाहिजे. जनसुनवाई झाली पाहिजे. अशा मागण्या तांबे यांनी पुढे केल्या. त्यावर महाजन यांनी या दोन्ही मागण्या मान्य केल्या. त्यावर महाजन यांनी समितीशी चर्चा करणार असल्याचे तसेच मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घातल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याला रात्री फोन केला होता. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. जनसुनावणी होईल आणि अहवाल 60 दिवसात येईल असे लेखी आश्वासन देण्याची मागणी तांबे यांनी महाजन यांच्याकडे केली. त्यावर महाजन यांनी लेखी आश्वासन देण्याचे फोनवरून जाहीर केले.
नाशिक पुणे रेल्वे साठी काय अडचण?
नाशिक पुणे शहर जवळ आणण्याच्या हेतूने सगळ्या गावांची प्रगती करण्यासाठी पाठपुरावा सुरू झाला आहे. मागच्या 25 वर्षापासून आम्ही हेच ऐकत आहोत रेल्वे होणार असल्याचे. भू संपादन झालेले शेतकरी कडे पैसे मागण्यासाठी आले तर ते कुठून देईल. रेल्वे भू संपादन साठी चांगली होती. रेल्वे स्टेशन टेंडर साठी चांगली मग काय झाले? बुलेट ट्रेन होते ,मग नाशिक पुणे रेल्वे साठी काय अडचण? रेल्वे आमच्या मुलांसाठी भविष्यासाठी नको आहे का ? अशी प्रश्नांची सरबत्ती सत्यजित तांबे यांनी यावेळी केली.
आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. सरकारला लोकांच्या मनातील भावना सांगण्याच्या असतील तर रस्त्यावर उतरावे लागेलय अश्विनी वैष्णव यांना भेटलो त्यांना सांगितले सरळ मार्गाने झाली पाहिजे त्यांना कोणी काय सांगितले आज अश्विनी वैष्णव देखील एकूण घ्यायला तयार नाहीत, असा आरोप त्यांनी केला. आम्हाला समृद्धी नाशिक पुणे रोखण्याची हौस नाही लोकांना त्रास द्याच नाही पण दोन चार तास रोखल्याने दोन चार पिढ्यांचे चांगले होईल, असे ते म्हणाले. जी कमिटी नेमली आहे ती रद्द करायची नाही. जे एम आर टी यांना अमोल कोल्हे यांनी विचारले तुम्हाला अडचण आहे का ते म्हणाले आम्हला अजून विचारलेच नाही तर अडचण कुठून आली, तुमचे नातवंडं विचारातील रेल्वे मार्गाचे काय झाले तेव्हा तुम्ही सांगा आम्ही आंदोलनात होतो सर्वांनी आंदोलनात आले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.