Election 2026 : काल युतीची घोषणा आणि आज हे असं व्हावं, उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, बडा नेता 43 वर्षानंतर शिवसेनेतून पडणार बाहेर

Municipal Election 2026 : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. काल मनसे सोबत युती जाहीर झाली आणि आज हे असं झालं. 43 वर्षांपासून निष्ठेने शिवसेनेते काम करणाऱ्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. इतक्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक मिळत असले तर काय उपयोग? अशा भावना सुद्धा त्याने व्यक्त केल्या.

Election 2026 : काल युतीची घोषणा आणि आज हे असं व्हावं, उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, बडा नेता 43 वर्षानंतर शिवसेनेतून पडणार बाहेर
Raj-Uddhav Thackeray
| Updated on: Dec 25, 2025 | 11:36 AM

राज्यात 29 महानगर पालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकाबाजूला युती, आघाड्यांचे निर्णय होत आहेत, तर दुसरीकडे पक्षांतराला सुद्धा वेग आला आहे. स्थानिक पातळीवरील अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आपली वर्षानुवर्षाची निष्ठा एक क्षणात बदलत आहेत. सध्या राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्या, कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे. आता नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकचे दोन माजी महापौर भाजपच्या गळाला लागले आहेत. एक आहेत, माजी महापौर विनायक पांडे आणि दुसरे यतिन वाघ भाजपात प्रवेश करणार आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे देखील भाजपाच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे.

विनायक पांडे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकमधील दिग्गज नेते मानले जातात. शाहू खैरे देखील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. भाजपने एकाचवेळी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला धक्का दिला आहे. विनायक पांडे यांनी पक्ष सोडणं ही मोठी बाब मानली जात आहे. पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माझ्या मुलाचं तिकीट कापलं

“गेल्या 43 वर्षापासून मी शिवसेनेत काम करतोय. मागच्या निवडणुकीत देखील माझ्या मुलाचं तिकीट कापलं. आता देखील तीच अवस्था आहे. संजय राऊत यांच्याशी मी बोललो. माझा मुलगा इच्छुक आहे पण त्यांचा अजून रिप्लाय आला नाही” असं विनायक पांडे म्हणाले.

विकास करायचा असेल भाजपात जाऊन शक्य आहे

“इतक्या वरिष्ठ नेत्याला अशी वागणूक मिळत असले तर काय उपयोग? म्हणून मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना सोडताना मला नक्कीच दुःख होत आहे. विकास करायचा असेल भाजपात जाऊन शक्य आहे. भाजपकडून तिकीट मिळेल. आमचा पूर्ण पॅनल प्रवेश करणार आह” असं विनायक पांडे म्हणाले. “उद्धव ठाकरे यांच्यावर माझी नाराजी नाही. ज्या पद्धतीने मागच्या निवडणुकीत माझ्यावर अन्याय झाला नंतर हाणामारीत रूपांतर झाले” असं ते म्हणाले.