मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय करावं लागेल, संभाजी छत्रपती यांनी दिला मास्टरप्लॅन

या योजना ग्रामीण भागापर्यंत कशा पोहचविता येईल, याचा मास्टर प्लॅन केला पाहिजे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काय करावं लागेल, संभाजी छत्रपती यांनी दिला मास्टरप्लॅन
संभाजी छत्रपतींनी केलं हे आवाहन Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 3:52 PM

नाशिक : सारथीचं कार्यालय नाशिकमध्ये सुरू झालं. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी माजी खासदार संभाजी छत्रपती महाराज उपस्थित होते. संभाजी छत्रपती म्हणाले, मराठा समाजाचं आरक्षण महत्वाचं आहे. अडीच वर्षे झालीत. रिव्हिव्ह पिटीशन टाकत आहोत. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं, मराठा समाज हा पोलिटीकल टर्मिनेटिंग क्लास आहे. त्यामुळं राजकीय आरक्षण मिळू शकत नाही. परंतु, यासाठी मराठा समाज हा सामाजिक मागास सिद्ध करावा लागेल. परत सर्वेक्षण करावं लागेल. चर्चा पहिली काय व्हावी, तर मराठा समाजाला सामाजिक मागास सिद्ध करावं लागेल, असा मास्टरप्लॅन त्यांनी दिला.

सारथीचं उद्घाटन तीन वर्षांपूर्वी पुण्याला झालं. पुढं जात असताना आंदोलनाची भूमिका असायची. आताच्या सरकारमध्ये सहकार्याची भूमिका आहे. त्यावेळी मागण्या मान्य करून घेण्यासाठी खाली बसून रस्त्यावर आंदोलन केलं होतं, याची आठवण संभाजी छत्रपती यांनी करून दिली.

तत्कालीन मंत्री आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आलं होते. त्यावेळी आमरण उपोषण करणं सोपं नव्हतं. माझं ते पहिलं आणि शेवटचं आंदोलन असेल. तिथं विद्यमान मुख्यमंत्री त्यावेळी मंत्री असताना भेटायला आले होते.

एक हजार 64 मुलांवर अन्याय झाला होता. मुलांवर अन्याय होता कामा नये. असं मी सांगितलं होतं. त्यावेळी कंटेप्ट ऑप कोर्ट होऊ शकत होतं. पण, मला जेलमध्ये जावं लागलं तर चालेल, असंही शिंदे यांनी त्यावेळी म्हटलं होतं, असं छत्रपती संभाजी यांनी सांगितलं.

1902 ला छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्यावेळी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आज मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. ते कसं मिळेल, यासाठी सारथी महामंडळाचा जन्म झाला.

खऱ्या अर्थानं सारथी ही संस्था मोठी होऊ शकते. गरीब मुलांना नोकऱ्या मिळू शकणार आहेत. वेगवेगळे कोर्सेस यातून मिळू शकतात. 50 मुलं सारथीच्या माध्यमातून आयपीएस झाले आहेत.

या योजना ग्रामीण भागापर्यंत कशी पोहचविता येईल, याचा मास्टर प्लॅन केला पाहिजे. सगळ्या योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत कसा पोहचविता येईल. वसतिगृह गरजेचं आहेत. एकंदरित आठ विभागीय कार्यालयांपैकी तीन झालेत. उर्वरित तीन विभागीय कार्यालयं लवकर सुरू व्हावेत. गरीब मराठ्यांसाठी सारथीतून मदत मिळत आहे, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.