चालकाचा ताबा सुटल्याने थेट दरीत कोसळली कार, चार जणांचा जागीच मृत्यू

पुण्याच्या नवले ब्रिजजवळ ट्रक आणि बसचा भिषण अपघात झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. याशिवाय दुसरा अपघात वडगाव ब्रिज परिसरात झाला. या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तीसरा अपघात हडपसर भागात झाला.

चालकाचा ताबा सुटल्याने थेट दरीत कोसळली कार, चार जणांचा जागीच मृत्यू
अपघात Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 1:57 PM

नंदुरबार : जिल्ह्यातील तोरणमाळ (Tormala Accident) येथे प्रवासी वाहनाचा अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गोरंबा गावापासून लेगापाणी या गावाकडे हे वाहन जात होते. यावेळी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने तीव्र उतारावरून गाडी ही खोल दरीत कोसळली. यामुळे हा मोठा अपघात झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी बांबूची झोळी करत मृतदेह बाहेर काढले आहेत. स्थानिकांच्या मदतीने चारही मृतदेह बाहेर काढण्यात आले असून जखमींना तातडीने म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.

घाटाचा रस्ता अतिशय धोकादायक

सातपुडा पर्वत रांगेत गोरंबा ते लेगापाणी दरम्यान संपूर्ण घाट रस्ता आहे. घाटात उताराची, चढाची धोकादायक वळणे आहेत. हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत गेल्या पाच वर्षांपासून निर्माणचे कार्य सुरू आहे. अतिशय धोकादायक घाटात रस्ता तयार करताना योग्य पद्धतीनं वळणावर नियमानुसार रस्त्याची निर्मिती केली गेली नसल्यानं तसेच वाहनांवर सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले कठडे व तत्सम उपायोजना ठेकेदारानं केली नाही. त्यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरत आहे. लेगापाणीपासून काही अंतरावर एका धोकेदायक वळणावर पिकअप वाहन चढत असताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. यानंतर हे वाहन मागच्या बाजूला येऊन खोल दरीत 700 ते 800 मीटर अंतरावर जाऊन कोसळले.

पुण्यात पहाटेपासून अपघाताची मालिका

पुण्याच्या नवले ब्रिजजवळ ट्रक आणि बसचा भिषण अपघात झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. याशिवाय दुसरा अपघात वडगाव ब्रिज परिसरात झाला. या अपघातात एका तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तीसरा अपघात हडपसर भागात झाला. रस्ता ओलांडताना एका पादचाऱ्याला दुचाकीने धडक दिली.

हे सुद्धा वाचा

पुण्यात मगरपट्टा रस्त्यावर दुचाकीने पादचाऱ्याला उडवलं. अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. ज्ञानोबा ढबळे असं अपघातात जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. आज पहाटे मगरपट्टा भागात हा अपघात झाला.

चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

नाशिक-छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील येवला तालुक्यातील रस्ते सुरेगाव येथे पहाटेच्या सुमारास कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून कंटेनर थेट घरात घुसला असून यात एक जण जखमी तर कंटेनरने उभी असलेली तीन वाहनांचे देखील नुकसान केल्याची घटना घडली आहे. जखमीला रुग्णालयामध्ये उपचार करता दाखल करण्यात आले असून संबंधित घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.