Ramayana Story : हे होते श्रीरामाच्या धनुष्य बाणाचे नाव, काय होते त्याचे वैशिष्ट्य?

अर्जुनाचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य फक्त बांबूचे होते. आणि कर्णाच्या धनुष्याचे नाव विजय होते. भगवान परशुरामांनी आपले विजय नावाचे धनुष्य कर्णाला दिले होते. श्री रामाच्या धनुष्याबद्दल अशी आहे माहिती.

Ramayana Story : हे होते श्रीरामाच्या धनुष्य बाणाचे नाव, काय होते त्याचे वैशिष्ट्य?
कोदंडImage Credit source: Social MEdia
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 8:01 PM

मुंबई : जेव्हा जेव्हा श्रीरामाबद्दल बोलले जाते किंवा राम-रावणाचा उल्लेख येतो तेव्हा त्यांच्या धनुष्य कौशल्याचाही उल्लेख अवश्य होतो. असे म्हणतात की रामाचे धनुष्य हे चमत्कारी धनुष्य होत. राम आणि त्यांच्या तीन भावांना गुरु वशिष्ठांनी इतर शस्त्रांसह धनुष्य आणि बाणाचा वापर करण्यास शिकवले होते. पुर्वीच्या काळात हे शिक्षण गुरुकुलात दिले जात असे. सहसा सर्व धनुर्धारी स्वतःचे धनुष्य स्वतः बनवत असत. बाणही (Ram Ban) स्वत: बनवून त्याला अभिमंत्रीत करत असत. धनुष्य बनवण्याची देखील एक कला होती.

भगवान रामाच्या धनुष्य बाणाचे नाव

प्रत्येक महान धनुर्धारी जो धनुष्य सोबत ठेवत असे. त्याचं एक खास नावही होतं. प्राचीन काळी धनुर्धारी धनुष्यबाण नेहमी सोबत ठेवत असत. भगवान रामाच्या धनुष्याचे नाव कोदंड होते. हे एक अतिशय प्रसिद्ध धनुष्य होते. म्हणूनच श्रीरामांना कोदंड असेही म्हटले गेले. ‘कोदंड’ म्हणजे बांबूपासून बनवलेला. कोदंड हे एक प्रभावी धनुष्य होते.

सर्वोकृष्ट धनुष्य

या धनुष्याच्या सहाय्याने रामाने लंकेला जाण्यासाठी समुद्रावर बाण सोडले आणि त्याचे पाणी सुकवले. या धनुष्यबाणाने त्यांनी वनवासात राहून अनेक राक्षसांचाही वध केला. याच्या मदतीने त्यांनी रावणाच्या सैन्याचा वध केला. राम हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध धनुर्धर होते. त्यांच्याशिवाय कोणीही त्यांच्या धनुष्याला स्पर्शही करू शकत नव्हते.

हे सुद्धा वाचा

तेव्हा धनुष्य कशाचे बनायचे

धनुष्य हे प्राण्याचे शिंग किंवा लाकूड याचे बनायचे. धनुष्याची तार बांबू किंवा इतर झाडांच्या तंतूंनी बनवली जायची. लाकडी धनुष्याची लांबी सहा फूट असायची. लहान आकाराचे धनुष्य सुमारे साडेचार फूट असायचे. बाणावरची पकड मजबूत आणि स्थिर करण्यासाठी जाड आवरण गुंडाळले जायचे.  प्राचीन भारतात धनुष्यबाणाचे संपूर्ण शास्त्र होते. त्याचे प्रकार चाणक्यपासून अनेक ग्रंथांमध्ये लिहिले गेले आहेत. कोदंडमंडन नावाच्या पुस्तकात तार जड असो वा हलकी यानुसार 18 प्रकारच्या धनुष्यांचा उल्लेख केला आहे. त्यांची वेगवेगळी वजने व मापेही दिलेली आहेत.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.