Accident | नवस राहिला अपूर्ण, यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघातात पाच भाविक ठार

Accident | यवतमाळ जिल्ह्यात पाच भाविकांवर काळाने घाला घातला. हे भाविक पोहरा देवीला नवस फेडायला जात होते. पण बेलगव्हान घाटात भीषण अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अ‍ॅपे रिक्षा उलटली. त्यात पाच भाविक जागीच ठार झाले तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Accident | नवस राहिला अपूर्ण, यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघातात पाच भाविक ठार
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 4:47 PM

यवतमाळ | 16 जानेवारी 2024 : पोहरा देवीला नवस फेडायला जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार झाले तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. पुसद-दिग्रस मार्गावर हा भीषण अपघात झाला. बेलगव्हान घाटात नाल्याच्या पुलावरुन अ‍ॅपे रिक्षा थेट खाली कोसळली. वाहनावरील नियंत्रण हुकल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात दुपारी 12 वाजता झाला. 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींमध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे.

नवस फेडायचा राहिलाच

पुसद तालुक्यातील मोहा तांडा, गोकी तांडा आणि पांढुर्ना गावातील भाविक पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी जात होते. त्यांनी सकाळीच सामानाची आवरासावर केली. नवस फेडण्यासाठीचे साहित्य घेतले. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे हे सर्व जण नवस फेडण्यासाठी जात होते. पण बेलगव्हान घाटातच काळाने त्यांच्यावर झडप घातली. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला.

हे सुद्धा वाचा

पुसद ग्रामीण रुग्णालयात उपचार

मोहा तांडा, गोकी तांडा आणि पांढुर्ना गावातील भाविक पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी जात होते. बेलगव्हान घाटात वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ऑटो पुलावरुन थेट खाली कोसळला. या अ‍ॅपे रिक्षामध्ये 15-20 जण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना बाहेर पडायला वेळच मिळाला नाही. यातील पाच जण ठार झाले तर अकरा जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर पुसद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस मृतांची आणि जखमींची ओळख पटवत आहेत. घटनेतील जखमींची विचारपूस करण्यासाठी आणि मदतीसाठी आमदार इंद्रनील नाईक आणि आमदार निलय नाईक यांनी मेडिकेअर रुग्णालयात धाव घेतली आहे.

झाला मोठा आवाज

हा अपघात झाला, तेव्हा अ‍ॅपे रिक्षामध्ये 15-20 जण होते. ऑटो पुलावरुन थेट खाली कोसळताच मोठा आवाज झाला. भाविकांच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी भाविकांना तातडीने मदत केली. पोलीस यंत्रणा धावून आली. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.