भयंकर! नवी मुंबईत भरधाव कारने 10 जणांना उडवलं; दोघांचा जागीच मृत्यू
navi mumbai accident : नवी मुंबईत भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईसह नवी मुंबईत पावसाचा कहर सुरू असताना एक भीषण अपघाताची घटना घडली आहे . नवी मुंबईच्या सेक्टर 10 मध्ये हा भीषण अपघात घडला आहे. कारवरील नियंत्रण सुटलेल्या चालकाने 8 ते 10 जणांना उडवलं. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर 8 जण जखमी झाले. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे कळतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 10 जणांना उडवल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातात काही जणांची प्रकृती स्थिर आहे. तर काही जणांची चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
नवी मुंबई पोलिसांनी अपघातस्थळाचा पंचनामा सुरू केला. त्यानंतर फरार चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अपघातामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी, रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तर एका कारचंही मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांनी मदतीसाठी तातडीने धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. तर काहींना जखमींना रुग्णालयात दाखल केले. भीषण अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल
कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघाताची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. नियंत्रण सुटलेल्या कारच्या धडकेमुळे वाहनांचं मोठं नुकसान झालंय. अपघातानंतर परिस्थितीचं गांभीर्य पाहून कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. अपघातानंतर कारचालक फरार झाला. पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केल्याचे समजतंय. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नवी मुंबईतील भीषण अपघातानंतर आता पादचाऱ्यांना रस्त्यावर चालणे सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. तसेच वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वाहनातील सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. रस्त्यावर बेदरकारपणे कार चालवणाऱ्यावर पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.