नवी मुंबईत अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक, भरारी पथकाने रंगेहाथ पकडलं, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

| Updated on: May 26, 2021 | 6:24 PM

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पूलाखाली मोठी कारवाई केली आहे (state excise duty team catches truck transporting foreign liquor illegally in Navi Mumbai).

नवी मुंबईत अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक, भरारी पथकाने रंगेहाथ पकडलं, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
नवी मुंबईत अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक, भरारी पथकाने रंगेहाथ पकडलं, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
Follow us on

नवी मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने आज (26 मे) सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पूलाखाली मोठी कारवाई केली आहे. या पथकाने मद्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला आहे. या ट्रकमध्ये दारुचे तब्बल 625 खोके मिळाले आहेत. भरारी पथकाने विदेशी मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण 67 लाख 57 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच एकाला अटक देखील करण्यात या पथकाला यश आलं आहे. त्याची कसून चौकशी केल्यावर आणखी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याचे संकेत आहेत (state excise duty team catches truck transporting foreign liquor illegally in Navi Mumbai).

भरारी पथकाने कारवाई कशी केली?

भरारी पथकाला गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या मद्याचा भरलेला ट्रक जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने कारवाई केली. या कारवाईत ब्लेंडर्स प्राईड, रॉयल चॅलेंजर्स, अरोबेला व्होडका, इम्पिरियल ब्लू व्हिस्की या ब्रँडच्या 750 मिली वजनाच्या बाटल्यांचे 525 खोके तर बडवायझर बियरचे अर्धा लीटर वजनाच्या टीनचे 100 खोके जप्त करण्यात आले आहेत.

आठ दिवसांपूर्वीही अशीच कारवाई

कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली. विशेष म्हणजे या पथकाने गेल्या सहा दिवसांपूर्वीच पनवेल येथे गोवा राज्यातील अवैध मद्याचे 56 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 500 खोके जप्त केले होते (state excise duty team catches truck transporting foreign liquor illegally in Navi Mumbai).

हेही वाचा : VIDEO : ‘दारू विकाल तर घरात घुसून मारू’, चंद्रपुरात नागरिकांचा संयमाचा बांध फुटला, अवैध दारूविक्रेत्याच्या घरावर हल्लाबोल