नवी मुंबईत लसीकरणाला गती, तृतीयपंथियांसाठी विशेष लसीकरण सत्र

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाला गती दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही घटक दुर्लक्षित राहू नये याकडेही बारकाईने लक्ष दिले जात आहे.

नवी मुंबईत लसीकरणाला गती, तृतीयपंथियांसाठी विशेष लसीकरण सत्र
Navi mumbai transgender Corona Vaccination
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 12:27 PM

नवी मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी राज्यातील सर्वांचे लसीकरण व्हावे, असा सरकारचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील दुर्लक्षित घटकांच्या लसीकरणाकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने विशेष लक्ष दिले जात आहे. यानुसार, वाशीत तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते. याचा लाभ 124 तृतीयपंथीयांनी घेतला. (Navi Mumbai Municipal Conducting special vaccination sessions for transgender in Vashi)

नवी मुंबईत लसीकरणाला गती

Navi mumbai transgender Corona Vaccination

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाला गती दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही घटक दुर्लक्षित राहू नये याकडेही बारकाईने लक्ष दिले जात आहे. यानुसार कॉरी परिसरात राहणाऱ्या व्यक्ती, रेडलाईट एरिआ तसेच रस्त्यावर राहणारे बेघर निराधार यांच्याकरिता महानगरपालिकेने विशेष सत्रांचे आयोजन केले आहे.

विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन

या सोबतच सेवा पुरविताना ज्या व्यक्तींचा नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क येतो अशा व्यक्तींसाठीही विशेष लसीकरण सत्र आयोजित केले जात आहे. यात रेस्टॉरंट, सलून, ब्युटी पार्लर, केमिस्ट, मेडिकल स्टोअर्समध्ये काम करणारे नागरिक तसेच रिक्षा – टॅक्सी चालक अशा कोव्हीडच्या दृष्टीने संभाव्य जोखमीच्या व्यक्तींकडेही (Potential Super spreaders) काळजीपूर्वक लक्ष दिले जात आहे. त्यांच्यासाठी विशेष लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.

तृतीयपंथीयांसाठी लसीकरण मोहिम

अशाचप्रकारे आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तृतीयपंथीयांसाठी लेट्स सेलिब्रेट फिटनेस यांच्या सहयोगाने वाशी सेक्टर 1 मधील स्पेस स्टुडिओमध्ये विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाईज आणि एलसीएफ या सेवाभावी संस्थांच्या वतीने तृतीयपंथीयांना जीवनावश्यक साहित्याचं वितरण करण्यात आले.

(Navi Mumbai Municipal Conducting special vaccination sessions for transgender in Vashi)

संबंधित बातम्या : 

केंद्र सरकारने लागू केलेला डाळीवरील कायदा रद्द करा, नवी मुंबईतील APMC मार्केटमधील मसाला आणि धान्य व्यापारांकडून बंदची हाक

महागाई, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, कार्यकर्त्यांसह वर्षा गायकवाडांची नवी मुंबईत सायकल रॅली

कोरोनामुळे 35 वर्षांपासून सुरू असलेला बँड बंद, पोटासाठी नवी मुंबईच्या रस्त्यावर ट्रंपेट वादन