शिवसेना बॅक टू पव्हेलियन येऊ शकते; रामदास आठवलेंचं मोठं विधान

| Updated on: Oct 04, 2021 | 5:50 PM

आगामी काळात शिवसेनचं बॅक टू पव्हेलियन होऊ शकते. आमची तशी अपेक्षा आहे, असं सांगतानाच राजकारणात अशक्य ते शक्य होऊ शकतं. (Shiv Sena can come back to the pavilion, says ramdas athawale)

शिवसेना बॅक टू पव्हेलियन येऊ शकते; रामदास आठवलेंचं मोठं विधान
ramdas athawale
Follow us on

खोपोली: आगामी काळात शिवसेनचं बॅक टू पव्हेलियन होऊ शकते. आमची तशी अपेक्षा आहे, असं सांगतानाच राजकारणात अशक्य ते शक्य होऊ शकतं, असं सूचक विधान रिपाइं नेते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

खोपोली नगरपालिकेने बसविलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं रामदास आठवले यांच्या हस्ते अनावर करण्यात आलं. यावेळी रामदास आठवले यांनी मीडियाशी संवाद साधताना हे सूचक विधान केलं. यावेळी मावळ खासदार अप्पा बारणे, आमदार महेद्रं थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष विनिता काबंळे याच्यांसह सर्व गटनेते, नगरसेवक, रिपाइं आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या सख्येंने उपस्थीत होते. राजकारणात काहीही होऊ शकतं. मी नरेंद्र मोदींसोबत गेलो नसतो तर केंद्रीय मंत्री झालो नसतो. उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर कदाचित मुख्यमंत्री झाले नसते. 1990मध्ये मी एकटाच शरद पवारांसोबत गेलो. त्यामुळे मंत्री झालो. बाकी सगळे मागे राहिले, याकडेही आठवले यांनी लक्ष वेधलं.

उद्धवजी, एनडीएत या

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवेसना एकत्र आली. तर भविष्यात भाजप, शिवसेना आणि रिपाइंही एकत्र येऊ शकते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. मी तुमच्यासोबत राहिलो असतो तर तुम्ही तिकडे आणि मीपण तिकडे असतो. पण मी योग्यवेळेला योग्य निर्णय घेतला, असं विधान त्यांनी मावळचे खासदार अप्पा बारणे यांना उद्देशून केलं.

मी एकटाच गेलो अन् मंत्री झालो

1990 मध्ये सुद्धा शर पवारांसोबत रिपब्लीकन पक्ष गेला. बाळासाहेब आंबेडकर, गवई साहेब, कवाडे सर या सर्वांना सांगतो होतो आमच्या बरोबर चला. ते बोललो तुम्ही एकटेच जा, मी एकटाच गेलो आणि मंत्री झालो. आणि हे सगळे राहीले मागे, असं मिष्किल उद्गार आठवलेंनी काढताच एकच खसखस पिकली. रिपब्लीकन पक्षाची ताकद ऐवढी आहे की, कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं ते आम्ही ठरवतो. आमची माणस निवडून आणण्याची सवय आम्हाला नाही. आमचा माणूस उभा राहिला की आणखी 10-15 माणस उभे राहतात अन् मग सगळेच पडतात, असंही ते म्हणाले.

तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते

बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकारांचे सबंध फार चागंले होते. मग उद्धव ठाकरे आणि माझे सबंध का बिघडलेले आहेत? आपले सबंध चागंले असले पाहिजे. उद्धवजींबद्दल मला आदर आहे. त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. कदाचित ते आमच्या सोबत राहिले असते तर मुख्यमंत्री झाले नसते. अजूनही तुम्हाला अडीच-अडीच वर्षाची ऑफर आहे. पण ही ऑफर स्विकारायची की नाही हा निर्णय उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे, असंही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

‘..तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या’, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

Cruise Party EXCLUSIVE Video : आर्यन खानला NCB ने उचललं, त्या क्रुझ पार्टीचा एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजप आमदार नमिता मुंदडांचं एक दिवस अन्नत्याग आंदोलन

(Shiv Sena can come back to the pavilion, says ramdas athawale)