Navi Mumbai : आज नवी मुंबईत पाणी पुरवठा बंद, तर उद्या नागपुरात पाणीबाणी!

| Updated on: May 24, 2022 | 10:03 AM

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांचा पाणीपुरवठा आज संध्याकाळपर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे.

Navi Mumbai : आज नवी मुंबईत पाणी पुरवठा बंद, तर उद्या नागपुरात पाणीबाणी!
नवी मुंबई पालिका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation) आज काही तांत्रिक दुरूस्तीच्या कारणामुळे पाणीपुरवठा बंद (Water supply cut) राहणार आहे. मोरबे धरण (Morbe Dam) ते दिघा मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील मान्सूनपूर्व दुरुस्तीचं काम तातडीने करण्यासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा होणार नसल्याचे पालिकेच्या पाणी विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या भागात पुर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या भागात पाणीपुरवठा पुर्णपणे बंद

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागांचा पाणीपुरवठा आज संध्याकाळपर्यंत पुर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा आणि सिडको क्षेत्रातील कामोठे, खारघर नोडमधील नवी मुंबई महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठादेखील बंद ठेवण्यात येणार आहे. नवी मुंबईतील नागरिकांनी गरजे एवढा पाणीसाठा करावा असे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे. तसेच पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पालिकेस सहाकार्य करावे असं पालिकेनं म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

उद्या नागपुरात पाणीबाणी!

उद्या नागपुरातील आठ जलकुंभाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. गोधनी पेंच -4, जल शुद्धीकरण केंद्र तीन तास बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा पाणी पुरवठा दुरूस्तीच्या कारणास्तव घेण्यात आला आहे. त्यामुळे आठ जल कुंभावर होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत सहकार्य करावे.