नवाब मलिक यांच्या कन्येचा नवा दावा, समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला केला ट्विट

| Updated on: Nov 20, 2021 | 9:31 PM

अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांनी आणखी एक ट्विट करत खळबळ उडवून दिलीय. त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे कथित मॅरेज सर्टिफीकेट ट्विटरवर अपलोड केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी समीर वानखेडे यांचे 2006 मध्ये शबाना कुरेशी यांच्याशी लग्न झाल्याचा दावा केलाय.

नवाब मलिक यांच्या कन्येचा नवा दावा, समीर वानखेडेंच्या विवाहाचा दाखला केला ट्विट
sameer wankhede
Follow us on

मुंबई : अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांनी आणखी एक ट्विट करत खळबळ उडवून दिलीय. त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे कथित मॅरेज सर्टिफीकेट ट्विटरवर अपलोड केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी समीर वानखेडे यांचे 2006 मध्ये शबाना कुरेशी यांच्याशी लग्न झाल्याचा दावा केलाय.

सना मलिक यांनी ट्विट केलेल्या कागदपत्रामध्ये काय आहे ?

सना मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या एका कागदपत्राचा फोटो अपलोड केला आहे. हे समीर वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचे कथित मॅरेज सर्टीफिकेट असल्याचा दावा करण्यात आलाय. तसेच 26 डिसेंबर 2006 रोजी हे सर्टीफिकेट जारी करण्यात आल्याचे यावर नमूद करण्यात आले आहे. सोबतच हे कथित मॅरेज सर्टिफीकेट ट्विटरवर अपलोड करताना सना मलिक यांनी पूर्ण सत्य जनतेसमोर देत आहे, असे कॅप्शन दिले आहे. यापूर्वी समीर वानखेडे यांची लग्नपत्रिका समोर आली होती. या लग्नपत्रिकेमध्ये दाऊद वानखेडे असा उल्लेख केलेला आढळतो. याचाच आधार घेत सना मलिक यांनी पूर्ण सत्य देत असल्याचे म्हणत लग्नाचा दाखला सोशल मीडियावर सार्वजनिक केला आहे. यापूर्वी समीवर वानखेडे यांचा निकाहनामा समोर आला होता.

अल्पवयीन असतानाच बारचं परमीट मिळालं : नवाब मलिक

याआधी नवाब मलिक यांनीदेखील समीर वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप केले होते. अल्पवयीन असतानाच वानखेडेंना बारचं परमीट मिळालेलं होतं असा आरोप मलिक यांनी 20 नोव्हेंबर रोजी केला होता. “ज्ञानदेव वानखेडे हे 1997मध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट काढलं होतं. त्याची नोंद ठाणे जिल्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावानं हे परमीट घेण्यात आलं. त्यावेळी समीर यांचं वय होतं 17 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस. बाप उत्पादन शुल्क विभागात काम करत होता. त्यामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलाला बारचं परमीट दिलं. हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे,” असं मलिक म्हणाले होते. वानखेडे यांच्या नावावर वाशी येथे हा बार आहे. या बारचं परमीट नुतनीकरणही करण्यात आलं आहे. 31 मार्च 2022पर्यंत या बारचं परमीट नुतनीकरण करण्यात आलं आहे. हे बार आणि रेस्टॉरंट आहे.

मुस्लीम किंवा दाऊद वानखेडे हे नाव दिसत नाहीये-  क्रांती रेडकर

समीर वाखनडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनीदेखील ट्विटरवर समीर वानखेडे यांच्या जन्माचा दाखला अपलोड केला आहे. त्यावर 1985 मध्ये शाळेत जन्माचा दाखला जमा करण्यात आला होता. सध्या मागवलेले प्रमाणपत्र हे जुन्या रेकॉर्डमधील आहे. यामध्ये मला कुठेही मुस्लीम किंवा दाऊद वानखेडे हे नाव दिसत नाहीये, असे क्रांती रेडकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सना मलिक यांनी वानखेडे यांच्या लग्नाचा कथित दाखला समोर आणल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे. आता समीर वानखेडे सना मलिक यांच्या दाव्यावर कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

VIDEO: ‘बिरोबाच्या नावानं चांगभलं…’ आझाद मैदान दुमदुमले, कोणत्याही परिस्थितीत परबांच्या बंगल्यावर धडक देणारच; एसटी कामगार इरेला पेटले

भाजपच्या रक्तातच मुस्लीम बांधवांविषयी विष, जनतेनं त्यांना जाब विचारावा: दत्तात्रय भरणे

बबनराव लोणीकरांची जीभ घसरली, टोपेंना म्हणाले हरामखोर, जालन्यात गुन्हा दाखल!