AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunetra Pawar : ‘म्हणूनच दादांचा अखेरचा श्वास..’ सुनेत्रा पवारांचा कंठ दाटून आला, डोळे पाणावले VIDEO

Sunetra Pawar :"दादांचा विकासाचा विचार पुढे नेण्याचा मी निर्धार केला आहे. दादा शब्दाला जागणारे होते. दादांना साक्ष ठेऊन मी तुम्हाला वचन देते. माझ्यासाठी पार्थ आणि जय एवढचं कुटुंब नाही. संपूर्ण बारामती माझा परिवार आहे. प्रत्येक बारामीतकर कुटुंबाचा सदस्य आहे" असं विश्वास सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांना दिला.

Sunetra Pawar : 'म्हणूनच दादांचा अखेरचा श्वास..' सुनेत्रा पवारांचा कंठ दाटून आला, डोळे पाणावले VIDEO
Sunetra Pawar
| Updated on: Apr 06, 2026 | 1:39 PM
Share

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा मेळावा होत आहे. “दोन महिन्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला गमावलं. आज त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा अजूनही आपल्यात नाहीत असं मला वाटतं नाही. दादाचं जाणं ही फक्त माझी, माझ्या कुटुंबाची व्यक्तीगत हानी नाही, तर बारामती, देश, महाराष्ट्राची हानी झाली असं म्हटल्यास वावग ठरणार नाही” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. “बारामती दादांसाठी आईसारखी होती. बारामतीचा प्रत्येक नागरिक दादांसाठी खरा पांडुरंग होता. बारामतीकरांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा हाच दादाचा विश्वास, आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास बारामतीच्या मातीत विसावला” हे बोलताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला, त्यांचे डोळे पाणवले.

बारामतीतल्या प्रत्येक झाडात, पानात, फुलात, रस्त्याला, शाळेत, नदी, इमारतीत दादांचा स्पर्श आहे. पानं, फुलं आज दादाच्या आठवणीने रडत आहेत. बारामतीकरांच्या विकासासाठी आदरणीय दादाचं स्वप्न साकार करण्यासाठी मी माझं दु:ख तळ घरात कोंडलं. अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारमतीकरांकडे बघून आला आहे” असं सुनेत्रा पवार बोलल्या. “तुमचं प्रेम, पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे. गेल्या 35-36 वर्षात आदरणीय अजितदादांना आपण प्रचंड मताधिक्क्याने निवडून दिलं आहे. दादांनी प्रत्येकवेळी स्वत:च्या मताधिक्क्याचे विक्रम मोडीत काढले. तुमच्या मतांचा बोजा म्हणून मी २४ तास काम करतो असं दादा नेहमी म्हणायचे. दादाच्या माघरी ही पहिलीच निवडणूक आहे. ही केवळ निवडणूक नाही, दादांना श्रद्धांजली अपर्ण करण्याची प्रत्येक बारामतीकराला संधी आहे” असं सुनेत्रा पवार बोलल्या.

हे दादांनी आपले शब्द खरे करुन दाखवले

“आदरणीय पवारसाहेबांनी विकासाचा दृष्टीकोन दिला. दादांनी आपल्या कष्टाने त्यात रंग भरले, कोंदण भरलं. बारामतीला जागतिक दर्जाकडे नेलं. मी तुम्हाला वचन देते बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही. बारामती हा जगातला सर्वात विकसित तालुका बनवणं हे दादांच फक्त स्वप्न नव्हतं तर ही दादांची जिद्द, ध्यास होता” असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. “बारामती जागतिक दर्जाचं शहर बनण्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असताना नियतीने दादांना आपल्यातून नेलं. त्यांना लोक कल्याणाची खरी तळमळ होते. जो पर्यंत जिवंत आहे, तो पर्यंत बारामतीकरांची सेवा करत राहीन हे दादांनी आपले शब्द खरे करुन दाखवले. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही” असं सुनेत्रा पवार बोलल्या.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.