AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेट अँड वॉच… बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट, संजय राऊतांकडून प्लॅन बी उघड, नक्की काय घडणार?

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज दाखल करत असून, शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबत मोठे विधान केले आहे. काँग्रेसचा उमेदवार आणि बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांवर राऊत यांनी दिलेली ही प्रतिक्रिया नक्की वाचा.

वेट अँड वॉच... बारामती पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट, संजय राऊतांकडून प्लॅन बी उघड, नक्की काय घडणार?
Sanjay raut suneatra pawar
| Updated on: Apr 06, 2026 | 10:44 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी आकस्मिक निधन झाले. या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. यासाठी आज महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसडून अ‍ॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता महाविकासाघाडी कोणाला पाठिंबा देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोणाला पाठिंबा देणार, याबद्दलचे सूचक वक्तव्य केले. तसेच काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला, याबद्दलही त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. बारामती हा पवारांचा गड आहे. तिथे काय निकाल लागणार हे सर्वांना माहिती आहे. पण राजकारणात काही विषय हे सामोपचाराने घ्यायचे असतात. थोडा वेळ थांबा, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

बारामती पोटनिवडणुकीबद्दल तुम्ही इतर पक्षांना प्रयस्न का विचारत नाहीत. सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. अजित दादांच्या पत्नी आहे. अजित दादांचे दुर्दैवाने निधन झाले. त्या जागेवर सुनेत्रा पवार निवडणूक लढत आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे आज त्या अर्ज भरत आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. सुनेत्रा पवारांनी स्वत: उद्धव ठाकरेंशी चर्चा केली, त्यांच्या शुभेच्छा घेतल्या. आता आम्ही महाविकासआघाडीत आहोत. तिकडे काँग्रेसने उमेदवार उभा केला आहे. सुनेत्रा पवार आणि उद्घव ठाकरे यांच्यात जी चर्चा झाली, ती चर्चा आम्हाला पाठिंबा द्या, यासाठीच असणार. अशाप्रकारचा फोन त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनाही केला. छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षाचे काही नेते शरद पवारांनाही भेटले. त्यामुळे हा निर्णय फक्त एका उद्धव ठाकरेंचा आहे का, यात खूप लोक आहे. बारामती हा पवारांचा गड आहे. तिथे काय निकाल लागणार हे सर्वांना माहिती आहे. पण राजकारणात काही विषय हे सामोपचाराने घ्यायचे असतात. आज त्या फक्त अर्ज भरणार आहेत. निवडणुकीला वेळ आहे. थोडा वेळ थांबा, असे संजय राऊत म्हणाले.

आज फक्त अर्ज भरणार आहेत. त्यानंतर मग अर्जाची छाननी होते. मग अर्ज मागे घेण्याचा दिवस येतो. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटतो. मग पुढे १० दिवस प्रचार होणार. त्या काळात पाठिंब्याचा प्रश्न निर्माण होतो. तिथे शिवसेनेचा उमेदवार नाही. तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार नाही. पण तिथे महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने उमेदवार दिला आहे. काँग्रेसचा एक पॅटर्न आहे की ते बिनविरोध निवडणुकीला विरोध करतात, अशीही आठवण संजय राऊतांनी करुन दिली.

सरकारविरोधी राग काढायाच त्यांच्यासाठी निवडणूक हे एक व्यासपीठ

असाच विरोध देवेंद्र फडणवीस यांनीही केला आहे. नांदेडला वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले, तेव्हा आम्ही सर्वांना विनंती केली होती. पण तरीही फडणवीस यांच्या पक्षाने तिकडे उमेदवार दिला आणि अमित शाहांपासून अनेक नेते प्रचाराला आले. पंढरपूरला भालकेंचे निधन झाले, त्यांच्या पत्नी उभ्या होत्या. तिथेही आम्ही भाजपला सांगितले की बिनविरोध निवडणुका करा, तिकडेही फडणवीसांनीही उमेदवार दिले. पण जेव्हा त्यांची गैरसोय असते, तेव्हा ते म्हणतात की बिनविरोध होऊ द्या. ज्यांना सरकारविरोधी राग काढायाच त्यांच्यासाठी निवडणूक हे एक व्यासपीठ असते, असे संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी बिनविरोध निवडणुकीचा पॅटर्न बदलला. महाराष्ट्रात एक संवदेनशीलता होती. त्यांनी ती मारुन टाकली. नाहीतर अशाप्रकारे आम्ही जी काही नाती जपली होती. पण जेव्हा देशात आणि राज्यात भाजप सरकार आले तेव्हा देशातील संवेदना पूर्णपणे मारली गेली. तरीही आम्ही एकमेकांशी बोलून असतो. उद्या एकमेकांशी बोललो म्हणून ईडी लावतील, असे संजय राऊत म्हणाले.

Follow Us
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओम
आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री... कथित डॉनच्या घरावर छापा