AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढील आठवड्यात लाँच होणार Itel चे ‘हे’ दोन नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या तारीख

आयटेल झेनो 100 लाइट आणि आयटेल झेनो 100 प्रो पुढील आठवड्यात भारतीय बाजारात लाँच केले जातील. लाँच झाल्यानंतर दोन्ही फोन कंपनीच्या वेबसाइटवर आणि ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असतील. चला तर मग हे फोन कोणत्या तारखेला लाँच होतील ते जाणून घेऊयात.

पुढील आठवड्यात लाँच होणार Itel चे 'हे' दोन नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या तारीख
| Edited By: | Updated on: Jul 11, 2026 | 4:36 PM
Share

आयटेल कंपनीचे दोन नवीन स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार आहेत. Zeno 100 Pro आणि Zeno 100 Lite अशी या स्मार्टफोनची नावे आहेत. लाँचच्या आधी दोन्ही स्मार्टफोनसाठी स्वतंत्र मायक्रोसाइट्स तयार करण्यात आल्या असून, त्यांवरून काही प्रमुख वैशिष्ट्ये समोर आली आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या दोन्ही फोनची लाँच तारीख प्रमुख फिचर्स जाणून घेऊयात.

आयटेल फोनची लाँच तारीख

आयटेलचे Itel Zeno 100 Lite आणि Itel Zeno 100 Pro हे प्रो मॉडेल पुढील आठवड्यात 16 जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत लाँच केले जाईल.

आयटेल झेनो 100 प्रो ची वैशिष्ट्ये

आयटेल झेनो 100 प्रो या फोनला MIL-STD 810H मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा प्रमाणपत्र मिळाल्याची पुष्टी झाली आहे, जे उष्णता आणि पडण्यापासून संरक्षण देते. टीझरमध्ये पॉइंट-अँड-टॅप कंट्रोल कनेक्टिव्हिटीचे संकेतही दिले आहेत, ज्यामुळे यात IR ब्लास्टरचा समावेश असू शकतो असे सूचित होते. जर हे वैशिष्ट्य उपलब्ध असेल, तर वापरकर्ते थेट त्यांच्या ITel स्मार्टफोनवरून टीव्ही, एसी आणि इतर घरगुती उपकरणे नियंत्रित करू शकतील. टीझरमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सिस्टीमदेखील दाखवण्यात आली आहे.

आयटेल झेनो 100 लाइटची वैशिष्ट्ये

मायक्रोसाइटवरून असे दिसून येते की, कंपनीचा आयटेल झेनो 100 लाइट हा फोन पॉवरफूल 5000mAh बॅटरीसह लाँच होईल. मिलिटरी-ग्रेड पॉवर व्यतिरिक्त या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट, अल्ट्रा-स्मूथ डिस्प्ले आणि 6.6-इंचाचा HD+ रिझोल्यूशन डिस्प्ले देखील असेल.

लाईट मॉडेलच्या लाँचची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. प्रो मॉडेलच्या लाँचची तारीख निश्चित झाली आहे, परंतु लाईट व्हर्जनच्या मायक्रोसाईट पेजवर ‘लवकरच येत आहे’ असे सांगण्यात आले आहे. कंपनीने फोनच्या लाँचची तारीख जाहीर केलेली नाही, परंतु लाईट मॉडेल प्रो मॉडेलसोबतच लाँच होईल अशी अपेक्षा आहे. उत्तम साउंड अनुभवासाठी डीटीएस इमर्स साउंड (मोठा, स्पष्ट आणि संतुलित आवाज) उपलब्ध असेल. लाँचची तारीख जसजशी जवळ येईल, तसतशी दोन्ही फोनची इतर वैशिष्ट्येही समोर येतील अशी अपेक्षा आहे.

Follow Us