AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत... ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?

आधी शिंदेंकडून मोठ्या गिफ्टच्या चर्चा आता थेट मुख्यंमंत्र्यासोबत… ओमराजे CM भेटीत असं काय घडलं?

| Updated on: Jul 11, 2026 | 12:22 PM
Share

काही आठवड्यांपूर्वी ठाकरे गटातील 6 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या घडामोडींमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत राहिले होते. शिंदे गटात प्रवेशानंतर त्यांना मोठी राजकीय जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

दरम्यान, आता ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मुंबईत झालेल्या या भेटीत मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सविस्तर बोलणी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही सादर केले. यामध्ये शेतकरी, पाणी आणि सिंचनाशी संबंधित प्रश्नांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे, पाणीटंचाई आणि सिंचन प्रकल्पांना गती देण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समोर आले आहे. या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Published on: Jul 11, 2026 12:22 PM

Follow Us