शरद पवार गटाच्या या नगरसेविकेचे पद झाले रद्द, जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने मोठा धक्का…

भिवंडी पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाच्या ) पक्षाच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द झाल्याने आता प्रभाग ४-अ ची जागा रिक्त झाली आहे.

शरद पवार गटाच्या या नगरसेविकेचे पद झाले रद्द, जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने मोठा धक्का...
Corporator Farzana Ansari Disqualified
| Edited By: | Updated on: Oct 21, 2026 | 10:59 PM

भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४-अ मधून राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाकडून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) या राखीव जागेवर निवडून आलेल्या फरजाना मोहम्मद सुलेमान अन्सारी (फरजाना सय्यद) यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. त्यामुळे पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी त्यांचे नगरसेवकपदही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. फरजाना मोहम्मद सुलेमान अन्सारी यांचे नगरसेवक पद रद्द ठरविल्याने प्रभाग क्रमांक ४-अ मधील नगरसेवकपदाची जागा रिक्त घोषित केली आहे.

भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयाने १२ ऑगस्ट २०२२ रोजी निर्गमित केलेले अन्सारी जातीचे इतर मागासवर्गीय प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले होते.समाजवादी पक्षाच्या पराभूत उमेदवार इरम अहमद हुसैन अन्सारी यांनी या जात प्रमाणपत्राबाबत आक्षेप नोंदवून तक्रार दाखल केली होती. शाळा सोडल्याच्या दाखल्या वरील जात नोंदींसह सादर करण्यात आलेले पुरावे आणि दक्षता पथकाच्या अहवालाची तपासणी केल्यानंतर समितीने हा निर्णय घेतला होता.

Loading...

भिवंडीच्या राजकीय वर्तुळात या कारवाईची चर्चा

जात पडताळणी समितीच्या निर्णयाच्या आधारे पालिका प्रशासनाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १०(१)(अ) तसेच जात प्रमाणपत्र पडताळणीविषयक कायद्यातील तरतुदीं नुसार फरजाना अन्सारी यांना नगरसेवकपदासाठी अपात्र ठरविले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांची निवड पूर्वलक्षी प्रभावाने रद्द मानण्यात येत असल्याचे आयुक्तांच्या आदेशात नमूद आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक ४-अ मधील जागा रिक्त घोषित करून या आदेशाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी राज्य निवडणूक आयोग, नगरविकास विभाग आणि संबंधित शासकीय कार्यालयांकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे भिवंडीच्या राजकीय वर्तुळात या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us