Sambhaji Bhide | बाकीच्या लोकांवर देशद्रोहचे गुन्हे, मग भिडे मोकाट का? छगन भुजबळ यांचा सवाल

| Updated on: Jul 31, 2023 | 12:35 PM

Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. त्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. भिडे यांच्यामागे त्यांचा बोलवता धनी कोण?

Sambhaji Bhide | बाकीच्या लोकांवर देशद्रोहचे गुन्हे, मग भिडे मोकाट का? छगन भुजबळ यांचा सवाल
Chhagan Bhujbal-Sambhaji Bhide
Follow us on

मुंबई : शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. संभाजी भिडे यांच्याविरोधात महाराष्ट्रात आंदोलन सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी संभाजी भिडे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. “महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी अतिशय गल्लीछ वक्तव्य केलं. भिडे यांच्यामागे बोलवता धनी कोण आहे? याचा देखील विचार होणं गरजेच आहे” असं छगन भुजबळ म्हणाले.

“इतिहास बदलता येईल का? असं काही सुरू आहे का? या माणसाला ताबडतोब अटक केली पाहिजे. उद्या पंतप्रधान पुणे मध्ये येत आहेत, त्यांच्या कानावर देखील या गोष्टी घातल्या पाहिजेत” असं छगन भुजबळ म्हणाले.

15 ऑगस्ट देखील मानायला तयार नाहीत’

“संभाजी भिडेंवर कडक कारवाई करून, सरकारने अटक केली पाहिजे. भिडे 15 ऑगस्ट देखील मानायला तयार नाहीत. बाकीच्या लोकांवर देशद्रोहचे गुन्हे दखल करून अटक करता, मग संभाजी भिडेंना सुद्धा अटक करुन जेलमध्ये ठेवलं पाहिजे” असं छगन भुजबळ म्हणाले.

‘जायचे का नाही ते पवार साहेब ठरवतील

“नाशिक शहरात देखील खड्डे पडले आहेत. नवीन आयुक्त नाशिकमध्ये आले आहेत. नवीन तंत्रज्ञान वापरून हे काम केले पाहिजे” असं भुजबळ म्हणाले. “लोकमान्य टिळक पुरस्कार समितीवर शरद पवार देखील आहेत त्यामुळे कदाचित ते जात असतील. पण तिथे जायचे का नाही ते पवार साहेब ठरवतील” असं छगन भुजबळ म्हणाले.

“नितीन गडकरी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. टीका का केली मला माहीत नाही, पण अशी टीका करून मैत्रीत दुरावा निर्माण करू नये” असं छगन भुजबळ म्हणाले.