शरद पवार यांच्या नंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आणखी एक जेष्ठ नेते रुगालयात

| Updated on: Nov 07, 2022 | 5:11 PM

छगन भुजबळ यांना काही दिवसांपूर्वी व्हायरल इन्फेक्शन झाले होते, त्यानंतर आज त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शरद पवार यांच्या नंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आणखी एक जेष्ठ नेते रुगालयात
Image Credit source: Social Media
Follow us on

नाशिक : राष्ट्रावादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या मुंबईत उपचार घेत आहे. ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निमोनियावर उपचार घेत आहे. असे असतांना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ देखील रुग्णालयात दाखल झाले आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती असून त्यांना सायंकाळी डिस्चार्ज मिळणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे. खरंतर मागील महिन्यात छगन भुजबळ यांचा वाढदिवस झाला आहे. त्या दरम्यान अनेकांनी शुभेच्छा देण्यासाठी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. त्यात त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याने ते मुंबईत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर छगन भुजबळ यांनी नंतर प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमात मास्क वापरल्याचे दिसून येत होते. रानवड येथील साखर कारखान्याच्या कार्यक्रमात भुजबळ एकटेच मास्क लावलेले दिसून आले होते. त्यानंतर शिर्डी येथील कार्यक्रमात देखील भुजबळ मास्क लावूनच दिसले होते.

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना सकाळी मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

छगन भुजबळ यांना काही दिवसांपूर्वी व्हायरल इन्फेक्शन झाले होते, त्यानंतर आज त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

माजी मंत्री छगन भुजबळ हे त्यांच्या वाढदिवसानंतर दहा दिवस मुंबईत आजारी होते, त्यानंतर त्यांनी प्रत्येक कार्यक्रमात मास्क लावल्याचे दिसून आले.

निफाड तालुक्यातील रानवड येथील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्घाटनासाठी हजर असतांना मास्क लावलेला होता.

त्यानंतर शिर्डी येथील राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या मंथन शिबिरासाठी हजर असतांना मास्क लावलेला होता, एकूणच भुजबळांनी कुठलेही इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेतली होती.