धनंजय मुंडे यांची तब्येत अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल

माजी मंत्री धनंजय मुंडे यांची तब्येत अचानक बिघडल्याची घटना घडली आहे. मुंडे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

धनंजय मुंडे यांची तब्येत अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल
NCP leader Dhananjay Munde
| Updated on: Sep 15, 2026 | 5:55 PM

माजी मंत्री धनंजय मुंडे यांची तब्येत अचानक बिघडल्याची घटना घडली आहे. मुंडे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये नेऊन त्यांची सोनोग्राफी करण्यात आली आहे. दुपारी जनता दरबार चालू असताना त्यांना अस्वस्थ वाटल्यामुळे परळी येतील एका खाजगी रुग्णालयमध्ये नेण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांची तब्येत अचानक बिघडल्याची घटना घडली आहे. मुंडे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये नेऊन त्यांची सोनोग्राफी करण्यात आली आहे. दुपारी जनता दरबार चालू असतान त्यांना अस्वस्थ वाटल्यामुळे परळी येतील एका खाजगी रुग्णालयमध्ये नेण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले जात आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येत धनंजय मुंडे याच्या नजिकचे असलेल्या वाल्मिक कराड यांचे नाव समोर आले होते. धनंजय मुंडे यांचा जवळचा मानला जाणारा आणि परळी नगरपालिकेचा पूर्व नगराध्यक्ष वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी आहे. या नंतर चहुबाजुंनी मुंडे यांच्यावर टीका झाल्याने धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्री पदाचा मार्च २०२५ मध्ये राजीनामा द्यावा लागला होता.

अलिकडेच धनंजय मुंडे यांचे व्यायाम करतानाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यात ते व्यायाम करताना दिसत होते. त्यांनी आता आपला नवा प्रवास सुरु होणार असल्याचे या फोटोंच्या कॅप्शनमध्ये म्हटले होते.त्यानंतर अशी अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्या चाहत्यात चिंता व्यक्त केली जात आहे.

राजकारणापासून अडगळीत गेले

संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या जवळची व्यक्ती वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना कृषी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ते राजकारणापासून जरा अडगळीत पडले होते.त्यानंतर आता त्यांनी वर्कआऊट करतानाचा नवा लूक सोशल मीडियावर सादर केला होता. त्यांनी व्यायाम करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. त्या फोटोच्या पोस्टवर त्यांनी एका कवितेच्या ओळी लिहिल्या होत्या. त्यात त्यांनी…, ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे… भेगाळलेले पाय आणि घायाळ मन; अजूनही धैर्य टिकवून आहे… निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे… हरवण्याची आता बिशाद कुणाची… स्वतःशी सुद्धा लढतो आहे…,’ अशा ओळी लिहिल्या होत्या.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us