Video : भाजपच्या बुद्धीबद्दलच मला शंका आहे, राजकारण हिमालयावरून खाली येतंय, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप!

| Updated on: Feb 24, 2022 | 11:51 AM

हा सगळा प्रकार अत्यंत हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी दिली आहे. 29 वर्षानंतर या आरोपांखाली नवाब मलिक यांना अटक होते, यामुळे भाजपच्या बुद्धीबद्दलच मला शंका येतेय, असं वक्तव्य त्यांनी केलं.

Video : भाजपच्या बुद्धीबद्दलच मला शंका आहे, राजकारण हिमालयावरून खाली येतंय, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप!
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांना झालेल्या अटकेनंतर आज महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. अंडरवर्ल्डला फंडिंग केल्याचा तसेच तसेच दाऊदशी संबंधित संपत्ती विकत घेण्याचा आरोप मलिक यांच्यावर करण्यात आला आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी दाऊदसंबंधी चौकशीनंतर नवाब मलिक यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली, हा सगळा प्रकार अत्यंत हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी दिली आहे. 29 वर्षानंतर या आरोपांखाली नवाब मलिक यांना अटक होते, यामुळे भाजपच्या बुद्धीबद्दलच मला शंका येतेय, असं वक्तव्य त्यांनी केलं. मुंबईत आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

केंद्र सरकार ज्या प्रकारे राज्यातील मंत्र्यांविरोधात कारवाई करत आहे, त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी उपहासात्मक टीका केली. ते म्हणाले, ‘ 1993 च्या बॉम्बस्फोटाला 29 वर्ष होतायत. मला बुद्धीबद्दलच शंका आहे. एकत्रितपणाने एखाद्याला बदनाम करण्याची फॅसिस्टची नीती आहे. एकाला टार्गेट करायचं आणि चहुबाजूंनी त्याच्यावर हमला करायचा. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. तीच क्रिया सध्या राज्यात चालू आहे, असे आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केले.

यशवंतराव चव्हाणांची काय संस्कृती होती…

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी देशातील राजकारण अत्यंत निम्न पातळीवर घसरले असल्याची टीका केली. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेत्याच्या राजकारणाची संस्कृती होती, आठवण करून देत त्यांनी एक किस्सा यावेळी सांगितला. यशवंतराव चव्हाण यांना संतान नाही, अशी टीका एकाने केली होती. त्यावेळी त्यांनी सदर व्यक्तीवर पुन्हा सूडबुद्धीने टीका न करता, कोणतेही राजकारण न करता या गोष्टीचं कारण सांगितलं. स्वातंत्र्ययुद्धात जो लाठीमार झाला, त्यामुळे हे घडलंय, असं स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर त्या माणसाने पुढे जाऊन चूक मान्य केली, अशी आठवण जितेंद्र आव्हाड यांनी सांगितली.

राजकारण हिमालयावरून खाली येतंय..

देशातील राजकारणाची पातळी खाली घसरतेय, अशी टीका करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘एकंदरीत भाजपच्या राजकारणाची पातळी हिमालयावरून खाली येताना दिसतेय. हे सगळं थांबवण्यासाठी मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. मला काहीही अधिकार नाही. पण केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये आता काही नातं राहिलेलंच नाही. हे फक्त द्वेषाचं, तिरस्काराचं नातं आहे. हे नातं टिकवणाऱ्या सरकारी समित्याच आता अस्तित्वात नाहीत. राज्याला केंद्र सरकारने काही अधिकारच ठेवलेले नाहीत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

इतर बातम्या-

Pune| पुण्यात भाजप आक्रमक ; अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची हकाल पट्टी करा

Nagpur School | भीक मागा नि फीस भरा! मुख्याध्यापिकेची पालकांना धमकी, शिक्षण विभाग काय कारवाई करणार?