आधी शाहांसोबत बैठक, मोदींचा फोन, आता पवार साहेब-पटेलांची भेट, ‘राज’कारण काय? नेमका संदेश कोणता?
राष्ट्रवादीत पार्थ पवार यांच्यामुळे ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजी नाट्याचा अंक सुरु असतानाच आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी आज शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि चर्चा केल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने आधी पुण्यातील रुबी रुग्णालयात आणि त्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, अजितदादांच्या राष्ट्रवादीत पार्थ पवार यांच्यामुळे ज्येष्ठ नेत्यांच्या नाराजी नाट्याचा अंक सुरु असतानाच आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी आज शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि चर्चा केल्याने खळबळ उडाली आहे. प्रफुल पटेल यांनी विधान परिषद निवडणूकीत उमेदवाराचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीने चिंतन करावे असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी अमित शाह यांची शिष्ठमंडळ घेऊन भेट घेतली होती. आणि आता शरद पवार यांना ते भेटल्याने या मागे दबावतंत्र तर नाही ना याची चर्चा सुरु आहे.
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणूकांनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीत भाजपाचे नेते अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकारणात खळबळ उडाली होती. या भेटीत पक्षाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार या पैकी कोणीच उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार हे रुग्णालयात दाखल झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करुन आम्ही देश सांभाळतो तुम्ही प्रकृती सांभाळा असा शरद पवार यांना दिला होता. यानंतर राष्ट्रवादीचे नाराज नेते प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची ब्रीच कँडी रुग्णालयात आज भेट घेतल्याने हा दबाव तंत्राचा तर भाग नाही ना अशी चर्चा सुरु आहे.