AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Thombre | हिंदुस्थानी भाऊच्या अटकेचे रुपाली ठोंबरेंकडून समर्थन, भडकाऊ भाईजान म्हणत मार्मिक ट्विट, म्हणाल्या…

ठोंबरे यांनी हिंदुस्थानी भाऊला भडकाऊ भडकाऊ भाईजान म्हणत त्याला सुनावण्यात आलेल्या कोठडीचे समर्थन केले आहे. याआधीही ठोंबरे यांनी प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊवर कारवाई करवी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती.

Rupali Thombre | हिंदुस्थानी भाऊच्या अटकेचे रुपाली ठोंबरेंकडून समर्थन, भडकाऊ भाईजान म्हणत मार्मिक ट्विट, म्हणाल्या...
rupali thombre and hindustani bhau
| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 7:08 AM
Share

मुंबई : ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात मुंबईतील धारावी येथे विद्यार्थी रस्त्यावर (Student Protest) उतरल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. हिंदुस्थानी भाऊच्या (Hindustani Bhau) भडकाऊ व्हिडीओमुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली, असा आरोप केला जातोय. हिंदुस्थानी भाऊचे तसे काही व्हिडीओदेखील समोर आले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी खोचक भाष्य केलं आहे. ठोंबरे यांनी हिंदुस्थानी भाऊला भडकाऊ भाईजान म्हणत त्याची अटक आणि सुनावण्यात आलेल्या कोठडीचे समर्थन केले आहे. याआधीही ठोंबरे यांनी प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊवर कारवाई करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती.

रुपाली ठोंबरे काय म्हणाल्या ?

हिंदुस्थानी भाऊ याला मुंबई पोलिसांनी अटक करुन कोर्टासमोर हजर केलं आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. या निर्णयानंतर राज्यभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी हिंदुस्थानी भाऊच्या अटकेचे समर्थन केले आहे. तर काही लोकांनी विरोध केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी हिंदुस्थानी भाऊला सुनावण्यात आलेल्या कोठडीचे समर्थन केलेय. धक्का बुक्की नही करणेका. रुको जरा थोडा कोठडीत. भडकाऊभाईजान, असे ट्विट ठोंबरे यांनी केले आहे.

हिंदुस्थानी भाऊविरोधात नागपुरात गुन्हा दाखल 

तर दुसरीकडे हिंदुस्थानी भाऊच्या अडचणी वाढत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणीखोर भाषण देऊन विद्यार्थ्यांना भडकावल्याच्या आरोपाखाली हिंदुस्थानी भाऊविरोधात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याआधी त्याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केलं होतं. आता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 1 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थानी भाऊ याने ऑफलाईन परीक्षांना विरोध करत विद्यार्थ्यांना धारावी परिसरात जमण्याचे आवाहन केले होते. तसा आरोप केला जातोय. हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडीओनंतर मुंबई, पुणे, नागपूर अशा शहरात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

इतर बातम्या :

साबुदाणा नेहमी प्रश्नांच्या तावडीत का सापडतो? जाणून घेऊया साबुदाणा बनवण्याबाबतच्या प्रक्रिये बद्दलची सत्यता

अल्पवयीन मुले मौजमजेसाठी चोरायचे बाईक, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात, सात गाड्या चोरल्याची कबुली

Bhiwandi Crime : भिवंडीत स्फोटकांसह तिघांना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, आरोपींकडून 1000 जिलेटीन व डीटोनेटर हस्तगत

मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.