Bhiwandi Crime : भिवंडीत स्फोटकांसह तिघांना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, आरोपींकडून 1000 जिलेटीन व डीटोनेटर हस्तगत

भिवंडी गुन्हे शाखेतील पोलीस पथकाने दुपारी 3 वाजता नदीनाका, पोलीस चौकीसमोर सापळा लावून मारूती इको कार क्रमांक MH-04/FZ-9200 या कारला थांबवून तपासणी केली. यावेळी गाडीत असलेले संशयित अल्पेश उर्फ बाल्या हिराजी पाटील, पंकज अच्छेलाल चौहान, समीर उर्फ सम्या रामचंद्र वेडगा यांना ताब्यात घेतले.

Bhiwandi Crime : भिवंडीत स्फोटकांसह तिघांना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, आरोपींकडून 1000 जिलेटीन व डीटोनेटर हस्तगत
भिवंडीत स्फोटकांसह तिघांना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात
संजय भोईर

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Feb 02, 2022 | 1:36 AM

भिवंडी : येत्या काही महिन्यात होणाऱ्या मुंबईसह ठाणे कल्याण भिवंडी या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. असे असतानाच भिवंडी गुन्हे शाखे(Bhiwandi Crime Branch)ने नदीनाका येथे कारवाई करीत कारमधून प्रतिबंधीत स्फोटक पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिलेटीन(Gelatin) व डिटोनेटर(Detonator) जप्त करीत त्रिकुटास बेड्या ठोकल्या आहेत. अल्पेश उर्फ बाल्या हिराजी पाटील (34, रा. आपटी खुर्द, ता. विक्रमगड), पंकज अच्छेलाल चौहान (23, रा. विक्रमगड), समीर उर्फ सम्या रामचंद्र वेडगा (27, रा. वेडगेपाडा, ता. विक्रमगड) अशी अटक करण्यात आलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत. या तिघांकडून 5 बॉक्समधून एकूण 1000 नग जिलेटिन कांड्या, 1000 नग डिटोनेटर असा कारसह एकूण 4 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Crime Branch arrests three in Bhiwandi with explosives, seizes gelatin and detonator from accused)

गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेची कारवाई

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना खबऱ्याकडून गुप्त माहिती मिळाली होती. एका मारूती इको कारमधून प्रतिबंधीत जिलेटीन व डिटोनेटर हे विक्री करण्याकरीता येणार असल्याची माहिती मिळाली गायकवाड यांना मिळाली होती. भिवंडी गुन्हे शाखेतील पोलीस पथकाने दुपारी 3 वाजता नदीनाका, पोलीस चौकीसमोर सापळा लावून मारूती इको कार क्रमांक MH-04/FZ-9200 या कारला थांबवून तपासणी केली. यावेळी गाडीत असलेले संशयित अल्पेश उर्फ बाल्या हिराजी पाटील, पंकज अच्छेलाल चौहान, समीर उर्फ सम्या रामचंद्र वेडगा यांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष गाडीची तपासणी केली असता 5 बॉक्समध्ये एकूण 1000 नग जिलेटिन कांड्या, 1000 नग डिटोनेटर जप्त केले. पोलीस पथकाने तिघांना ताब्यात घेत कारसह एकूण 4 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींविरोधात निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बेकायदेशीर स्फोटकांची बॉम्बशोधक व नाशक पथक ठाणे यांच्या मदतीने तपासणी करुन सदरची स्फोटके सुरक्षितरित्या जप्त करण्यात आली आहेत. सदर स्फोटके आरोपी चोरी करुन विक्रीसाठी नेत असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी पुढील कारवाई करीत ताब्यात घेतलेल्या इसमांविरूध्द निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींविरोधात कलम 286 सह भारताचा स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 चे कलम 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime Branch arrests three in Bhiwandi with explosives, seizes gelatin and detonator from accused)

इतर बातम्या

अल्पवयीन मुले मौजमजेसाठी चोरायचे बाईक, ‘असे’ अडकले पोलिसांच्या जाळ्यात, सात गाड्या चोरल्याची कबुली

IT Raid : तळघरात 600 लॉकर्स, 3 कोटी रकमेसह दागिने हस्तगत, नोएडातील माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या घरात सापडले घबाड

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें