AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाची माहिती

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्री पदावरुन हटवणार की त्यांना अभय मिळणार? अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Manikrao Kokate :  कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वाची माहिती
माणिकराव कोकाटे
| Updated on: Jul 29, 2025 | 11:42 AM
Share

पावसाळी अधिवेशन चालू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरुन सुरु झालेला वादा अजूनही संपलेला नाही. माणिकराव कोकाटे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्री पदावरुन हटवणार की त्यांना अभय मिळणार? अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माणिकराव कोकाटे वादात सापडण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे ते वादात सापडले आहेत. माणिकराव कोकाटे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती.

माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून हटवण्याऐवजी त्यांना समज द्या, करावाई नको, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा सूर आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्याऐवजी खात बदललं जाऊ शकत अशी सूत्रांची माहिती आहे. महाराष्ट्रात कृषी खातं हे महत्त्वाच मंत्रालय आहे. सध्या महराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्र्यांकडून संवेदनशील वक्तव्य, व्यवहाराची अपेक्षा असते. पण मागच्या काही काळात माणिकराव कोकाटेंच वर्तन या उलट दिसून आलं. त्यामुळे त्यांच्या बद्दलची नाराजी वाढली ते वादात सापडले.

‘हा विषय आता माझ्या हातात नाही’

अजितदादांसोबत होणाऱ्या बैठकीपूर्वी, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नये, अशी मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने अजित पवारांची भेट घेतली होती. “कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे उत्तम कृषिमंत्री आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊ नका,” अशी भूमिका या शिष्टमंडळाने मांडली होती. मात्र, यावर अजित पवारांनी ‘हा विषय आता माझ्या हातात नाही’ असं उत्तर दिलं. यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात असल्याचे बोललं जात आहे. अजित पवारांनी कोकाटेंना बैठकीत चांगलच झापल्याची चर्चा आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं,” अशा शब्दांत अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले. “तुमच्या वक्तव्यामुळे सरकारची खूप प्रतिमा मलिन झाली आहे. आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं आहे. पण हा विषय आता पुढे गेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात माझ्याकडे नाराजी व्यक्त केली आहे,” असे सांगत अजित पवारांनी स्पष्टपणे भूमिका मांडली.

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग