मोठी बातमी! डिलिमीटेशन बिलावरून राष्ट्रवादी शरद पवार गटात पहिली ठिणगी, नेत्याच्या ट्विटने खळबळ

पुन्हा एकदा राज्यात डिलिमिटेशन बिलाचा मुद्दा तापला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याकडून डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा देण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

मोठी बातमी! डिलिमीटेशन बिलावरून राष्ट्रवादी शरद पवार गटात पहिली ठिणगी, नेत्याच्या ट्विटने खळबळ
sharad pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 4:52 PM

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला पूर्णपणे ब्रेक लागला आहे. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून डिलिमीटेशन बिलाला पाठिंबा देण्याचे संकेत मिळत आहेत. कारण सर्वच राज्यांमध्ये पन्नास टक्के जागा वाढवल्यास डिलिमीटेशन बिलाच्या पाठिंब्यावर विचार करू असं विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. तर दुसरीकडे मात्र डिलिमीटेशन बिलावरून महाविकास आघाडीमधील मतभेद देखील समोर आले आहेत. काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नताशा आव्हाड यांनी पक्षाच्या या भूमिकेला उघडपणे विरोध केला आहे. नताशा आव्हाड या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या आहेत. नताशा आव्हाड यांनी डिलिमीटेशन बिलावरून केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. नताशा आव्हाड यांनी या ट्विटमधून भाजप तसेच आपला पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. जर माझा पक्ष डिलिमीटेशन बिलाला पाठिंबा देणार असेल तर त्याला माझा विरोध असेल, या विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे या राष्ट्राची आणि त्याच्या संविधानाची मोठी हानी करण्यासारखे होईल, मला आशा आहे, की पक्ष आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करेल, असं नताशा आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Loading...

नेमकं काय म्हणाल्या नताशा आव्हाड?

‘जर माझा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करत आहे, या अफवा खऱ्या असतील तर मी या निर्णयाचा तीव्र निषेध करते. वाढत्या मतदार संख्येच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना आवश्यक असली तरी, प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना विधेयक हा विरोधी पक्षाला मिळणाऱ्या जागांची संख्या मर्यादित करण्याचा आणि त्याच वेळी भाजपला अवाजवी फायदा मिळवून देण्याचा एक घटनाबाह्य प्रयत्न आहे. आपली लोकप्रियता सतत कमी होत असताना, हा भाजपचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. ज्या कोणाला या राष्ट्राची लोकशाही व्यवस्था टिकवायची आहे, त्यांनी या विधेयकाला जोरदार विरोध करावा केलाच पाहिजे, या विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे या राष्ट्राची आणि त्याच्या संविधानाची मोठी हानी करण्यासारखे होईल, मला अशा आहे की पक्ष आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करेल’ असं ट्विट नताशा आव्हाड यांनी केलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us