आता सहन नाही करणार.. परळच्या राड्यात जखमी झालेल्या सागरला भेटल्यानंतर निलेश राणेंकडून वॉर्निंग

ईदच्या मिरवणुकीदरम्यान बुधवारी रात्री परळ परिसरात राडा झाला होता. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाची निलेश राणे यांनी भेट घेतली आहे. यावेळी बोलताना त्यांनी काही गंभीर आरोप देखील केले आहेत.

आता सहन नाही करणार.. परळच्या राड्यात जखमी झालेल्या सागरला भेटल्यानंतर निलेश राणेंकडून वॉर्निंग
Nilesh Rane
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 9:23 PM

ईदच्या मिरवणुकीदरम्यान बुधवारी रात्री परळ परिसरात राडा झाला होता. मशीद परिसरात दुचाकीस्वार हॉर्न वाजवत असल्याने त्यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर दोन गटात राडा झाला. या प्रकरणात पोलिसांनी मध्यस्थी केली, तणावाचं वातावरण निर्माण झालं. या ठिकाणी पोलिसांना सौम्य बळाचा देखील वापार करावा लागला. दरम्यान या घटनेत डोक्याला लोखंडी सळई लागल्याने सागर अनिल देवगडकर हा तरुण गंभीर जखमी झाला होता. या तरुणाची आता शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी भेट घेतली आहे. शिवसेना संपूर्ण ताकदीने पाठिशी उभी आहे, असं अश्वासन देखील त्यांनी यावेळी पीडित तरुणाला दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले निलेश राणे?

गणपती आगमनाच्या वेळी आणि उत्सवाच्या काळात काही टवाळखोर आणि समाज कंटक हे वस्त्यांमध्ये घुसून वातावरण बिघडवण्याचा पूर्वनियोजित कट रचत असल्याचा आरोप यावेळी निलेश राणे यांनी केला आहे. लालबाग आणि भायखळा परिसरातील घटनेनंतर सुरक्षेत त्रुटी राहिल्याचा दावा करत, दोषींवर कडक कारवाई करण्याऐवजी पोलीस स्थानिकांवरच अन्याय करत असल्याचंही ते यावेळी म्हणाले, दरम्यान याप्रकरणी आगामी अधिवेशनात आपण आवाज उठवणार आहोत, असा इशाराही राणे यांनी यावेळी दिला आहे.

घटनेदरम्यान पोलीस कर्मचारी आणि महिलांबद्दल अपशब्द वापरण्यात आले. मात्र तरी देखील केवळ मोजक्याच लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.​ सण-उत्सवांमध्ये आणली जाणारी विघ्ने आणि देवाची होणारी विटंबना आता सहन केली जाणार नाही, पोलिसांनी वेळीच योग्य ती कारवाई न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा थेट इशारा यावेळी निलेश राणे यांनी दिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

ईदच्या मिरवणुकीदरम्यान बुधवारी रात्री परळ परिसरात ही घटना घडली आहे. मशीद परिसरात दुचाकीस्वार हॉर्न वाजवत असल्याचा आरोप करून स्थानिकांनी त्यावर आक्षेप घेतला. यावरून वाद वाढला, वादाचं रूपांतर राड्यात झालं. या घटनेत सळई लागल्याने सागर अनिल देवगडकर हा तरुण गंभीर जखमी झाला होता.

Follow Us