AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! …तर एकनाथ शिंदेंचा जीव धोक्यात आला असता, रामदास कदमांच्या आरोपांवर नितेश राणेंचा सर्वात मोठा दावा

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, मनोज जरांगे पाटील यांनी ऐकवलेल्या क्लिपवरून रामदास कदम यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता नितेश राणे यांच्याकडून देखील मोठा दावा करण्यात आला आहे.

मोठी बातमी! ...तर एकनाथ शिंदेंचा जीव धोक्यात आला असता, रामदास कदमांच्या आरोपांवर नितेश राणेंचा सर्वात मोठा दावा
nitesh raneImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 23, 2026 | 9:22 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली या कथित ऑडिओ क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना देण्यासाठी भाजपकडून पाचशे कोटी रुपये घेतले आणि ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत देण्यात आले, असा दावा करण्यात आला होता. या ऑडिओ क्लिपवरून आता वातावरण चांगलं तापलं आहे. या ऑडिओ क्लिपनंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

भाजपला एकनाथ शिंदे यांची भीती वाटत आहे का? एकनाथ शिंदे यांना संपवण्याची सुपारी भाजपमधून कोणी घेतली? एकनाथ शिंदे हे विश्वास ठेवून भाजपसोबत आले.   कशा पद्धतीने भाजपचा प्लान चालतो, पैसे पक्षाकडून द्यायचे नाही पैसे परस्पर द्यायचे, तुमच्या प्रवीण दरेकर यांचं देखील नाव आलं आहे.  याचे उत्तर भाजपला सुद्धा द्यावे लागेल, असं कदम यांनी म्हटलं होतं. दरम्यान कदम यांच्या या आरोपांना आता भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे, त्यांनी कदम यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले राणे?  

रामदास कदम यांच्या वक्तव्यावर मंत्री नितेश राणेंनी तीव्र आक्षेप घेतला आहे.  कदम हे स्वतःच्या मनाने बोलतायत की शिंदेंच्या मान्यतेने? असा सवालच राणे यांनी उपस्थित केला आहे. रामदास कदम यांच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदेंची मान्यता आहे का? फडणवीसांनी साथ दिली नसती तर शिंदेंचा जीव धोक्यात आला असता, असा मोठा दावा यावेळी राणे यांनी केला आहे. दरम्यान अशा वक्तव्यांमुळे महायुतीत फूट पडून विरोधकांना आनंद होईल, रामदास कदम यांच्या वक्तव्यावर शिंदेंनी भूमिका स्पष्ट करावी, असंही यावेळी राणे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी देखील याच मुद्द्यावरून कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…