शरद पवारांनी माणुसकी टिकवली, पण…; रोहित पवारांना तीनपाट, पप्पू म्हणत नितेश राणेंचा हल्लाबोल

रोहित पवारांना तीनपाट, पप्पू म्हणत नितेश राणेंनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी रोहित पवार यांना शरद पवारांच्या सामाजिक प्रवासाची आठवण करून दिली.

शरद पवारांनी माणुसकी टिकवली, पण...; रोहित पवारांना तीनपाट, पप्पू म्हणत नितेश राणेंचा हल्लाबोल
rohit pawar and nitesh rane
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 12:25 PM

अजितदादा अपघात प्रकरणात रोहित पवारांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रोहित पवारांच्या आरोपांनतर भाजप नेते तुटून पडले आहेत. अनेक नेत्यांनी रोहित पवारांचा आरोप खोडून टाकला आहे. आता मंत्री नितेश राणे यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी तीनपाट, पप्पू म्हणत रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय. यावेळी राणेंनी थेट रोहित पवार यांना शरद पवारांच्या सामाजिक प्रवासाची आठवण करून दिली.

नितेश राणे म्हणाले, महाराष्ट्रात शरद पवारांचा सामाजिक प्रवास बघितला, तर राजकारणाच्या पलीकडे संबंध आणि माणुसकी टिकवली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले राजकीय संबंध. वैयक्तिक संबंध. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले वैयक्तिक संबंध. देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबध. त्यांना ते कधीच राजकारणाशी जोडत नाहीत. हा तीनपाट…स्वत:ला पवार  म्हणते. त्याने थोबाड उघडून..पहिलं एक मफलर दाखवतो. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी नाव जोडतो. यांच्यासारखा नमक हराम.. मिठाला न जागणारा व्यक्ती महाराष्ट्राने पाहिला नसेल.  आधी आपला मित्र समजायचो. मी त्याला अभ्यासू समजायचो. आता राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंनाही पप्पू बनण्यात रोहित पवारांनी मागे टाकलं आहे. स्वतं: त्यांनी अकलेचे प्रदर्शन केले’.

Loading...

सदाभाऊ खोत काय म्हणाले?

सदाभाऊ खोत म्हणाले, ‘देवाभाऊ हा कलियुगातील अभिमन्यू आहे. तुमच्या चक्रव्यूहात फसणार नाहीत. अजितदादांविषयी संपूर्ण महाराष्ट्राला आदर आहे. त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पुण्यात पार पडत असताना रोहित पवार यांनी केलेले वक्तव्य म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. अरे बाबा, शेतामध्ये पेरणी केली की पीक कशाचं येणार हे कळतं. पण इथं सहा महिन्यांत संशयाचं पीक बदलतंय. याचं बीज तेवढं जरा महाराष्ट्राला तुम्ही नेमकं सांगा. रोहित पवारांची ही जी धडपड चाललेली आहे,  ती खुर्चीसाठी चाललेली ही केविलवाणी आणि कपटनीतीची कूटनीती रोहित पवार राजकारणाच्या पटलावर राबविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु  हे कदापि शक्य होणार नाही. कारण देवाभाऊ हा कलियुगातला अभिमन्यू आहे, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या चक्रव्यूहात कधीही फसणार नाही’.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us