
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया 15 जानेवारी 2026 रोजी पार पडली होती. आज 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यातील जनतेचे या निकालाकडे लक्ष लागलेले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी 2026 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 आणि 14 मधील निकालावर सर्वांचे लक्ष असणार आहे. या प्रभागांमध्ये काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात.
प्रभाग 14 मध्ये काँग्रेसचे 3 तर एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला आहे. प्रभाग 14 मध्ये भाजपकडून उमेदवार न दिल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला फायदा झाला आहे. या प्रभागातून काँग्रेसच्या नाझीया अत्तार, सामीया खान, सुफी जीन आणि अजित पवार राष्ट्रवादीचे जागृती गांगुर्डे विजयी झाल्या आहेत.
प्रभाग क्रमांक 13 हा प्रामुख्याने सिडको (CIDCO) आणि अंबड विभागाचा भाग आहे. या प्रभागाचा विस्तार उत्तम नगर, पवन नगरचा काही भाग, अंबड गावठाण आणि माऊली नगर या परिसरापर्यंत पसरलेला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 37000 ते 41000 च्या दरम्यान आहे. हा प्रभाग मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गाचे प्राबल्य असलेला भाग म्हणून ओळखला जातो. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून गजानन शेलार (राष्ट्रवादी) वत्सला खैरे (काँग्रेस) शाहू खैरे (काँग्रेस) सुरेखा भोसले (मनसे) यांनी विजय मिळवला होता.
प्रभाग क्रमांक 14 मध्ये पवन नगर, सावता नगर, सिडको बस डेपो परिसर आणि लेकनगरचा काही भाग समाविष्ट होतो. या प्रभागाची लोकसंख्या अंदाजे 39000 ते 43000 च्या आसपास आहे. हा परिसर नाशिकमधील सर्वात नियोजित आणि गजबजलेल्या निवासी क्षेत्रांपैकी एक आहे. या प्रभागाचा विस्तार सिडकोच्या प्रमुख चौकांपासून ते अंबड लिंक रोडच्या काही भागापर्यंत आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणावर उद्याने आणि बाजारपेठांचे जाळे असून नागरी सुविधांच्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा मानला जातो. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून शोभा साबळे (राष्ट्रवादी) समिना मेमन (राष्ट्रवादी) मुशिर सय्यद (अपक्ष) सुफी जिम (राष्ट्रवादी) या उमेदवारांनी विजय मिळवला होता. आता 2026 च्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE