
नाशिक महानगरपालिकेच्या (NMC) 2026 च्या निवडणुकीसाठी मतदान 15 जानेवारी 2026 रोजी पार पडले. आता 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 3 आणि 4 बाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. प्रभाग क्रमांक 3 मधून गेल्या निवडणुकीत मच्छिंद्र सानप (भाजप) प्रियंका माने (भाजप) ऋची कुंभारकर (भाजप) पूनम मोगरे (शिवसेना) हे उमेदवार निवडून आले होते. या दोन्ही प्रभागाची माहिती जाणून घेऊयात.
प्रभाग क्रमांक 3 हा प्रामुख्याने पंचवटी विभागांतर्गत येतो. या प्रभागात दिंडोरी रोड, म्हसरूळ शिवारातील काही भाग, मखमलाबाद रोडचा पूर्व भाग आणि मेरी-म्हसरूळ परिसराचा समावेश होतो. 2011 च्या जनगणनेनुसार या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 35000 ते 40000 च्या दरम्यान आहे. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे (BJP) वर्चस्व राहिले होते. या प्रभागातून 2017 मध्ये मच्छिंद्र सानप (भाजप) प्रियंका माने (भाजप) ऋची कुंभारकर (भाजप) पूनम मोगरे (शिवसेना) हे उमेदवार निवडून आले होते. या परिसरात प्रामुख्याने मध्यमवर्गीय वस्ती असून शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे आहे.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 4 मध्ये हिरावाडी, पेठ रोड, कातकाडे नगर आणि पंचवटीचा उत्तर भाग समाविष्ट आहे. या प्रभागाची लोकसंख्या अंदाजे 38,000 ते 42000 च्या आसपास आहे. हा भाग वेगाने विकसित होणारा निवासी विभाग म्हणून ओळखला जातो. 2017 च्या महापालिका निवडणुकीत येथून भाजप आणि शिवसेनेमध्ये चुरस पाहायला मिळाली होती. या प्रभागातून भाजपचे हेमंत शेट्टी, शांताबाई हिरे, सरिता सोनवणे, जगदीश पाटील हे निवडून आले होते. या प्रभागाचा विस्तार आरटीओ ऑफिसपासून ते पेठ रोडवरील वसाहतींपर्यंत पसरलेला आहे.
प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये 2017 साली भाजपने शानदार विजय मिळवला होता, विजयाची हीच लय कायम ठेवण्याचे आव्हान आता भाजपसमोर असणार आहे. तर इतर पक्षची भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न करणार आहेत.
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE