
नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 चा सविस्तर कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केला होता. या घोषणेनुसार मतदान 15 जानेवारी 2026 रोजी पार पडले असून आज 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. नाशिकमधील प्रभाग क्रमांक 5 आणि 6 ची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
नाशिक महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 5 हा प्रामुख्याने पंचवटी विभागांतर्गत येतो. या प्रभागाचा विस्तार म्हसरूळ, आडगाव शिवारातील काही भाग आणि अमृतधाम परिसरापर्यंत पसरलेला आहे. 2011 च्या जनगणनेवर आधारित आकडेवारीनुसार, या प्रभागाची अंदाजे लोकसंख्या 35,000 ते 40,000 च्या दरम्यान आहे. या प्रभागात चार सदस्य आहेत. 2017 साली या प्रभागातून निवडून आलेले मुख्य उमेदवार कमलेश बोडके (भाजप) नंदिनी बोडके (मनसे) विमल पाटील (अपक्ष) गुरमीत बग्गा (अपक्ष) हे होते. या प्रभागात प्रामुख्याने मध्यमवर्गीय वस्ती आणि झपाट्याने विकसित होणारा निवासी परिसर येतो.
प्रभाग क्रमांक 6 हा देखील पंचवटी विभागाचाच एक भाग असून यात तपोवन, जनार्दन स्वामी मठ परिसर, नांदूर नाका आणि पंचवटीचा काही पूर्व भाग समाविष्ट होतो. या प्रभागाची लोकसंख्या अंदाजे 38000 ते 42000 च्या आसपास आहे. या प्रभागाचा विस्तार गोदावरी नदीच्या काठावरील धार्मिक क्षेत्रापासून ते नवीन नागरी वसाहतींपर्यंत आहे. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून अशोक मुर्तडक (मनसे) आणि भाजपच्या भिकूबाई बागुल, सुनीता पिंगळे, पुंडलीक खोडे
यांनी विजय मिळवला होता. हा प्रभाग नाशिकच्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
नाशिकमधील प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मध्ये भाजपसह मनसे आणि अपक्षांचेही वर्चस्व पहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता कुणाच्या गळ्यात सत्तेची माळ टाकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE