सर्वात मोठी बातमी! राज ठाकरेंना परप्रांतीयाकडून शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल!

काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारझोडही केली जात आहे. मराठी आग्रहासाठी मीरा भाईंदरच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला केलेली मारहाण राज्यात चांगलाच चर्चेत आला होता. दरम्यान, मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या याच मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना एका परप्रांतीयाने शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या परप्रांतीयाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

सर्वात मोठी बातमी! राज ठाकरेंना परप्रांतीयाकडून शिवीगाळ, व्हिडीओ व्हायरल!
raj thackeray
| Updated on: Aug 23, 2025 | 10:02 PM

Raj Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागताच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे हा पक्ष सक्रीय झाला आहे. या पक्षाने मुंबई, ठाणे तसचे उपनगरात मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे. मनसेचे कार्यकर्ते मुंबईत हिंदी बोलणाऱ्यांना मराठी बोलण्याचा आग्रह करताना दिसत आहेत. काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारझोडही केली जात आहे. मराठी आग्रहासाठी मीरा भाईंदरच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला केलेली मारहाण राज्यात चांगलाच चर्चेत आला होता. दरम्यान, मराठी भाषेचा आग्रह धरणाऱ्या याच मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांना एका परप्रांतीयाने शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या परप्रांतीयाचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

अंधेरीतील परप्रांतीयाने केली शिवीगाळ

मिळालेल्या माहितीनुसार अंधेरीताल परप्रांतीयाने राज ठाकरे यांचे नाव घेत शिवीगाळ केली आहे. शिवीगाळ केल्याचा हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुजित दुबे असे राज ठाकरेंना शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीयाचे नाव आहे. दरम्यान, सुजित दुबे याचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ समोर येताच मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

दुबे याच्याविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांनी केली अटक

मिळालेल्या माहितीनुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सुजित दुबे यांच्या दुकानाची तोडफोड केली आहे. तसेच दुबे याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. हे प्रकरण समोर येताच अंधेरी एमआयडीसीच्या पोलिसांनी दुबे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. तर दुसरीकडे दुबे याच्या दुकानाची तोडफोड करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसेचे कार्यकर्ते अन्य पवित्रा घेणार का?

सुजित दुबे याने दारुच्या नशेत राज ठाकरे यांचा उल्लेख करत शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज ठाकरेंचे कार्यकर्ते अन्य पवित्रा घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद तापणार का? असेही विचारले जात आहे.