
राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात मराठा आरक्षण आंदोलनानंतर वितुष्ठ निर्माण झाले आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे सातत्याने करत असल्याने ओबीसी समाज दुखावला आहे. ओबीसी समाजाने या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या निर्णयाचा कायम विरोध केला आहे. या ओबीसींनी पुन्हा या विरोधात लढा सुरु केला असतान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींच्या लढ्याला पाठींबा देत आता नवीनच मागणी केली आहे.
धनगर समाजासाठी दीपक बोराडे यांनी पंधरा दिवसांपासून जालना येथे उपोषण सुरु केले होते. त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी २ ऑक्टोबरला उपोषण मागे घेतले आहे. या पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी आता धनगर समाजानेचे ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व केले पाहीजे अशी मागणी केली आहे. ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. परंतू तेलंगणा राज्यासारखे ते ६२ टक्क्यांवर देखील नेता येईल असे प्रकाश आंबडेकर असे यावेळी आंबेडकर म्हणाले. धनगर समाजाने महाराष्ट्र विधानसभेची सत्ता हाती घेऊन हे आरक्षण वाढवावं तरच समाजाला न्याय मिळेल असेही प्रकाश आंबडेकर यावेळी म्हणाले.
ओबीसींनी या राज्याची सत्ता हाती घ्यावी आणि आता लोकांनीही SC आणि ST उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. जर ते नसतील तर मुस्लीम उमेदवारांना मतदान केलं पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबडेकर यांनी केली आहे. सवर्ण लोकांनी लोकांनी अन्याय केलेला आहे. ओबीसी लोकांनी या सवर्णांना मतदान करू नये असे आवाहन मी त्यांना करतो असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. आपली सगळ्यांची सामाजिक आणि राजकीय ओळख आता OBC म्हणूनच झाली पाहिजे.या सगळ्यांना एकत्रित आणलं पाहिजे. सगळ्या समाजाने एकत्र येऊन त्याची ओळख OBC झाली पाहिजे असे आंबेडकर यावेळी म्हणाले.
ओबीसी समाजाचं नेतृत्व आपण करत आलो आहे. १९८० पासून आम्ही ओबीसी समाजाचं नेतृत्व करत आलो आहे, यात तसूभर देखील बदल केलेला नाही. आमच्या समाजात प्रमाणिक नेता होत नाही याची खंत आहे.ओबीसी लोकांनी सत्ता आणली पाहिजे. मला मुख्यमंत्री आणि मंत्री व्हायचं नाही, लोकांना सत्तेत आणणे हे काम महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेबांनी केलं आणि तेच कार्य पुढे घेऊन जाण्याची माझी इच्छा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. खंडोबा या देवाला गोळवलकर पासून मोहन भागवत यांनी एकदा तरी भेट दिली आहे का ? हे दाखवा असाही सवाल यावेळी आंबेडकर यांनी केला.