Health Ministry : आता एमपीएससीद्वारे नव्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती; 400 पेक्षा अधिक डॉक्टरांना गमवावे लागणार पद!

| Updated on: Jul 25, 2022 | 7:17 AM

आत सरकारी रुग्णालयातील (Hospital) नव्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरण्यात येणार आहेत. त्यामुळे मागील पंधरा ते वीस वर्ष सरकारी रुग्णालयात सेवा देणाऱ्या आणि सेवेत कायम होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या डॉक्टरांवर(doctor) अन्याय झाल्याचे चित्र आहे.

Health Ministry : आता एमपीएससीद्वारे नव्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती; 400 पेक्षा अधिक डॉक्टरांना गमवावे लागणार पद!
सरकारी सेवा बजावणा-या डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, राज्य सरकारच्या आदेशाला हायकोर्टाची स्थगिती
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : आत सरकारी रुग्णालयातील (Hospital) नव्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरण्यात येणार आहेत. त्यामुळे मागील पंधरा ते वीस वर्ष सरकारी रुग्णालयात सेवा देणाऱ्या आणि सेवेत कायम होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या डॉक्टरांवर(doctor) अन्याय झाल्याचे चित्र आहे. नव्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातील असे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले असून, भरती प्रक्रियेला सुरुवात देखील झाली आहे. ही भरती 427 पदांसाठी होणार असून, त्यासाठी अर्ज देखील मागवण्यात आले आहेत.मात्र यामुळे ज्या डॉक्टरांच्या वैद्यकीय अधिकारी म्हणून तात्पुरत्या स्वरुपात नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी गेली 15 ते 20 वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली त्या डॉक्टरांमध्ये नाराजी असल्याचे पहायला मिळत आहे.

फडणवीसांकडे तक्रार

याप्रकरणी सर जे. जे. रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पहाणाऱ्या डॉ. अरुण राठोड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. डॉ. राठोड हे गेल्या 15 वर्षांपासून निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.ते सुरुवातीला ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आता सर जे. जे. रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पहात आहेत. त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, हे पद कायम असताना देखील आपन तात्पुरत्या नियुक्तीवरील वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत आहोत. मात्र आता आपल्या मागील 15 वर्षांच्या योगदानाचा विचार न करता माझ्या जाग्यावर एमपीएससीमार्फत भरलेल्या कायमस्वरूपी डॉक्टरांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा अन्याय असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

भरतीसाठी अपात्र

जे डॉक्टर सध्या शासनाच्या विविध रुग्णालयात तात्पुपत्या स्वरुपात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, त्यातील अनेक डॉक्टरांचे वय हे 45 वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ते आता एमपीएससीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्यास अपात्र आहेत. मात्र त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून 15 ते 20 वर्ष सेवा बजावली आहे. त्यांना अचानक काढून त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याने हा अन्याय असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे.