लक्ष्मण हाकेंनी केली मोठी घोषणा, मनोज जरांगेंना थेट इशारा, वातावरण तापलं

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून मुंबईमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठी घोषणा केली आहे.

लक्ष्मण हाकेंनी केली मोठी घोषणा, मनोज जरांगेंना थेट इशारा, वातावरण तापलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2025 | 4:44 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा बांधव आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली असून, सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात एकवटल्याचं पहायला मिळत आहे. मराठा समाज मुंबईच्या दिशेनं निघाला आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन होणार आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं ही मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे.  त्यासाठीच आता मुंबईमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.

दरम्यान दुसरीकडे मात्र ओबीसी नेत्यांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला विरोध होत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.  मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके यांनी आता थेट जरांगे पाटील यांना इशारा दिला आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले हाके? 

मनोज जरांगे पाटलांची मागणी बेकायदा आहे, असा आरोप यावेळी लक्ष्मण हाके यांनी केला आहे. शासनाने त्यांना फॅक्ट समजून सांगितलं पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात अराजक निर्माण होऊ शकते, असा इशाराही यावेळी हाके यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा तेवढा मेळवावा ओबीसी मुळासकट संपवावा, असाच जरागेंच्या मागणीचा अर्थ होतो. ओबीसी जरांगेंच्या आंदोलनाल प्रति आंदोलन पुकारतील त्यांची संख्या जेवढी आहे त्याच्या दहापट संख्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेली दिसेल, अशी घोषणाही यावेळी हाके यांनी केली आहे.

जरांगे कधी कोणाची स्तुती करतील आणि कोणाच्या रसदीवर आंदोलन उभं करतील याचा नेम नाही. अजित पवारांच्या आमदारांनी जरांगेंना रसद पुरवली, जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांविरोधात खालच्या स्थरावर टीका करत आहेत, मात्र तरी देखील सत्तेतील माणसं  जरांगे पाटलांना रसद पुरवत आहेत. ओबीसीच्या मंत्र्यांनी गट निर्माण करून मुख्यमंत्र्यांना बोललं पाहिजे, असंही यावेळी हाके यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us