AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला बघून घेऊ…OBC आरक्षणामुळे लक्ष्मण हाकेंना संताप अनावर, थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, म्हणाले अन्यथा तुम्हाला…

मचा डीएनए ओबीसीचा असेल तर ओबीसींचे आरक्षण वाचवा, अन्यथा तुम्हाला घरी बसवावं लागेल. निवडणुकीत तुम्हाला बघून घेऊ, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

तुम्हाला बघून घेऊ...OBC आरक्षणामुळे लक्ष्मण हाकेंना संताप अनावर, थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान, म्हणाले अन्यथा तुम्हाला...
devendra fadnavis and laxman hakeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2026 | 5:27 PM
Share

OBC And Laxman Hake : राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. राज्य सरकारने नुकतेच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत राज्यात आता ज्या सोई-सुविधा ओबीसींना लागू असतील त्या सर्व सुविधा आता मराठा समाजाला लागू होणार आहेत. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे हे वेळोवेळी आंदोलन करत आहेत. त्यामुळे मराठा समाज ओबीसीत आला तर मूळ ओबीसींवर अन्याय होईल, अशी भावना ओबीसी बांधवांकडून व्यक्त केली जाते. ओबीसीचींही ही बाजू ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके वेळोवेळी मांडत आले आहेत. दरम्यान, आता याच लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. ओबीसी एकवटला तर सत्ताधाऱ्यांना घरी बसावे लागेल, असा इशाराच हाके यांनी दिला आहे.

बीसी एकवटला तर सत्ताधारी…

तुमचा डीएनए ओबीसीचा असेल तर ओबीसींचे आरक्षण वाचवा, अन्यथा तुम्हाला घरी बसवावं लागेल. निवडणुकीत तुम्हाला बघून घेऊ, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. बेरोजगार तरुणांना झुरळ म्हणल्यावर देशातला जेन झी, कॉकरोच जनता पार्टीच्या रुपात एकवटले आहेत. आम्ही ओबीसी तर 60 टक्के आहोत. ओबीसी एकवटला तर सत्ताधारी, कारखानदार, भांडवलदार यांना घरी बसावं लागेल, असंही हाके यांनी ठणकावून सांगितले आहे. लक्ष्मण हाके हे सांगलीत बोलत हेते.

भांडवलदार, वतनदारांना घरी बसवू

जे ओबीसींनाते मराठा समाजाला हे आम्हाला मान्य नाही.ज्या दिवशी ओबीसी राजकीय भूमिका घेईल त्यादिवशी तुम्हाला पळता भुई थोडी होईल. ज्या दिवशी ओबीसी म्हणून ओबीसी एकत्र येईल, त्यादिवशी प्रस्थापित भांडवलदार, वतनदारांना घरी बसवू, असंही लक्ष्मण हाके म्हणाले. दरम्यान, मराठा समजाला ओबीसींच्या सर्व सुविधा लागू झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी ओबीसी नेत्यांवर कठोर शब्दांत टीका केली होती. ओबीसी नेता असल्याचे सांगून हे फायदा करून घेणारे नेते आहेत, असा टोला जरांगे यांनी लगावला होता.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात