AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच, गुपचूप उरकला नेत्याचा प्रवेशसोहळा, शिवसेना शिंदे गटाला पुन्हा मोठा झटका

शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये इनकमिंग सुरू असल्यामुळे शिवसेना शिंदे गट नाराज आहे, दरम्यान आता पुन्हा एकदा भाजपने एकनाथ शिंदे यांना धक्का दिला असून, मोठी बातमी समोर येत आहे.

भाजपमध्ये इनकमिंग सुरूच, गुपचूप उरकला नेत्याचा प्रवेशसोहळा, शिवसेना शिंदे गटाला पुन्हा मोठा झटका
भाजपात पक्षप्रवेश Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2025 | 7:48 PM
Share

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे, आतापर्यंत अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे, यामध्ये महाविकास आघाडी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशा सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसला आहे, यावरून शिवसेना शिंदे गटानं अनेकदा नाराजी देखील व्यक्त केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार देखील घालण्यात आला होता. मात्र हे सर्व नाराजीनाट्य सुरू असतानाच आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरात शिवसेना शिंदे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आह. शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका शिल्पा वाडकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या उपस्थितीत शिल्पा वाडकर यांनी पक्षात प्रवेश केला आहे.  एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपकडून महापालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर हा मोठा  झटका मानला जात आहे.  शिल्पा वाडकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता, त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे.  शिल्पा वाडकर यांचा प्रवेश सोहळा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शिवसेना शिंदे गटाची नाराजी 

दरम्यान भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असल्यानं आता शिवसेना शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीनंतर देखील भाजपात प्रवेश सुरूच आहेत. आतापर्यंत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार घातला होता, तर शिवसेना शिंदे गटाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...