…म्हणूनच सांगलीचा संचालक गोकुळवर नियुक्त होणार, सरकारचं मोठं षडयंत्र, सतेज पाटलांनी बोलून दाखवली ती भीती

गोकुळवर चार संचालक नेमण्याचा अध्यादेश राज्य सरकारकडून काढण्यात आला आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आज याविरोधात कोल्हापुरात मोठा मोर्चा काढण्यात आला, या मोर्चामध्ये बोलताना सतेज पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

...म्हणूनच सांगलीचा संचालक गोकुळवर नियुक्त होणार, सरकारचं मोठं षडयंत्र, सतेज पाटलांनी बोलून दाखवली ती भीती
Satej Patil
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 09, 2026 | 3:16 PM

गोकुळवर चार संचालक नेमण्याचा अध्यादेश राज्य सरकारकडून काढण्यात आला आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वात याविरोधात कोल्हापुरात भव्य असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना सतेज पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अमूल आणि मदर डेअरी असे दोनच ब्रँड या देशात ठेवण्याचं सरकारचं हे षडयंत्र असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले सतेज पाटील?

Loading...

आज अवस्था काय आहे? मी ही संचालकांची नाव मुद्दामहून वाचून दाखवली, कारण तुम्हाला हे कळलं पाहिजे की, या सरकारला या जिल्ह्यात एकही पात्र माणूस संचालक म्हणून मिळाला नाही का? असा सवाल यावेळी सतेज पाटील यांनी केला आहे. या जिल्ह्यातील एकही दूध उत्पादक यांना मिळाला नाही का? जो चौथा माणूस इथे नियुक्त होणार आहे तो सांगलीचा आहे. मतांचा अधिकार याबद्दल आमचा कोर्टात वाद सुरूच आहे. जनतेतील लढाई देखील आम्ही लढत आहोतच, परंतु किमान तज्ज्ञ संचालक नेमताना ज्या गोकुळचं कलेक्शन या कोल्हापूर जिल्ह्यातून दहा ते बारा लाख लिटरच्या वर आहे, त्या जिल्ह्यातील एकही माणूस तुम्हाला संचालक म्हणून सापडू नये, या सारखे दुसरं दुर्दैव कोणतं नाही, आणि म्हणूनच मी आरोप करतोय की उद्या हा गोकुळ दूध संघ अमुलच्या दावणीला बांधला जाणार आहे, याची सुरुवात आता सांगलीतला तज्ज्ञ संचालक देण्यापासून झाली आहे.

मी सातत्याने म्हणतो आहे, की सरदार पटेल मिल्क फेडरेशन नावाची एक व्यवस्था गुजरातमध्ये मागच्या वर्षी उभारली गेली आहे. एनडीडीबीचा शेअर त्यामध्ये आहे, अमूलचा शेअर त्यामध्ये आहे. बनासचा शेअर त्यामध्ये आहे. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्येच म्हटलं आहे की, शंभर कोटी लीटर दूध गोळा करण्यासाठी वीस राज्यांमध्ये याचा विस्तार आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत. छोटे-छोटे दूध संघ हे सगळे या फेडरेशनच्या अधिपत्याखाली येतील. उद्याच्या काळामध्ये या देशात फक्त दुधाचे दोनच ब्रँण्ड ठेवायचे एक अमुल आणि दुसरा मदर डेरी. हे दोन ब्रँड दुग्धजन्य पदार्थांमध्ये राहतील बाकीच्यांनी या दोन ब्रँडच्या खाली काम करायंच हे षडयंत्र आहे. तरी मी महिनाभर गोकुळमध्ये बोलत होतो, महिनाभर आरोप करत होतो, पण एकानेही माझ्या आरोपांचं खंडण केलं नाही, एकानेही असं म्हटलं नाही की आम्ही गोकुळला सरदार पटेल मिल्क फेडरेशनमध्ये जाऊ देणार नाही, याची देखील नोंद घेतली जावी, असं यावेळी सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us