AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना खुलं चॅलेंज, महिलेची थेट पोलीस स्टेशनला धाव, अडचणी वाढणार? समोर आलं मोठं कारण

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाऊन उपोषण करू असा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर त्यांनी आपलं आंदोलन मध्येच मागे घेतलं. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना खुलं चॅलेंज, महिलेची थेट पोलीस स्टेशनला धाव, अडचणी वाढणार? समोर आलं मोठं कारण
Manoj Jarange PatilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 30, 2026 | 7:46 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासंदर्भात असलेल्या आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाला सुरुवात केली. आता हे निर्णायक आंदोलन असेल असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र पंधरा दिवस होऊन देखील मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर तोडगा न निघाल्याने अखेर त्यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर त्यांनी मुंबईच्या वाटेवर असतानाच आपलं आंदोलन मागे घेतलं. मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर आपलं आंदोलन आता स्थगित झाल्याची घोषणा त्यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी आता तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे.

मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अंतरवाली सराटी येथील रहिवासी असलेल्या ललिता तारख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही गंभीर आरोप केले. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण कसं सुरू होतं, हे मला माहीत आहे, आणि वेळ आल्यावर मी ते सांगेल असंही त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर ललिता तारख या सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा  मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय राहिलेल्या ललिता तारख यांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.  सोशल मीडियावर आपलं चारित्र्यहनन केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मी घाबरणार नाही, मी पण अंतरवालीमधली आहे, 3 वर्ष आंदोलन अंतरवालीत कसं झालं हे मला चांगलं माहीत आहे.  “मी सत्य विचारायची हिंमत केली म्हणून माझ्या विरोधात ट्रोलिंग होत आहे. मनोज दादा तुम्ही सोशल मीडियावर माझ्याविरोधात ट्रोलिंग करायला लावलं आहे का? असा थेट सवालच ललिता तारख यांनी उपस्थित केला आहे.

ज्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून तुम्ही उपोषण करता त्या शिवरायांचे विचार तुमच्याशी कुठेच जुळत नाहीत. तुमची सोशल मीडिया टीम माझ्याबद्दल गलिच्छ बोलत आहे, आणि ते थांबत नसल्यामुळे मला बोलावं लागत आहे. मी तुमची भगिनी आहे तर तुमची सोशल मीडियावरची टीम माझ्या विरोधात का बोलत आहे, याचा अर्थ मी काय समजायचा? यात कोणाचा हात आहे? आरक्षणाच्या संघर्षात मी होते, त्यामुळे मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. मी घाबरणार नाही मी पण अंतरवालीमधली आहे, असं म्हणत आता ललिता तारख  यांनी थेट जरांगे पाटील यांना खुलं आव्हानच दिलं आहे.

Follow Us
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार