AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Tiger Part 2 : खासदारांनंतर ठाकरेंचे आता 14 आमदार..शिंदे आज दुपारी दिल्लीत, राजकीय घडामोडींना वेग,महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार?

Operation Tiger Part 2 : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आज दुपारी दिल्लीत जात आहेत. खासदारांनंतर आता उद्धव ठाकरे गटाचे 14 आमदार रडारवर आहेत.

Operation Tiger Part 2 : खासदारांनंतर ठाकरेंचे आता 14 आमदार..शिंदे आज दुपारी दिल्लीत, राजकीय घडामोडींना वेग,महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडणार?
Eknath Shinde-Uddhav Thackeray
| Updated on: Sep 01, 2026 | 12:49 PM
Share

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवू शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. ऑपरेशन टायगरच्या पार्ट 2 ची चर्चा आहे. उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या रडारवर आहे. काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाचे 6 खासदार फोडून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला होता. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचेच आमदार शिंदेंच्या रडारवर असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे गटाच्या 20 आमदारांपैकी 14 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. हे आमदार फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तीन मंत्र्यांवर जबाबदारी सोपवल्याची चर्चा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आज दुपारी 2 वाजता दिल्लीत येत असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंचा यांचा हा दौरा रिझर्व्ह स्वरुपाचा आहे.

म्हणजे एकनाथ शिंदे दिल्लीत आल्यावर कोणा-कोणाला भेटणार? या बद्दल काही स्पष्टता नाहीय. आज सकाळपासून ऑपरेशन टायगर पार्ट 2 ची चर्चा सुरु झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यात ऑपरेशन टायगर सक्रिय झालं आहे. एकनाथ शिंदे दिल्लीत वरिष्ठ भाजप नेत्यांची भेट घेणार आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होईल. एकनाथ शिंदे आज कॅबिनेटला येणार नाहीत. एकनाथ शिंदे थेट दिल्लीला होणार रवाना. 2 सप्टेंबरपासून सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्हाबाबत पुन्हा सुनावणी सुरू होत आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या वकिलांची टिम आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एकनाथ शिंदे भेट घेणार आहेत.

किती आमदारांना खाती, मंत्रीपदं हवीत?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंनी तीन मंत्र्यांवर सोपवली आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी दिल्याची माहिती आहे. 14 पैकी पाच आमदारांना सरकारमध्ये चांगली खाती, मंत्रि‍पदं हवी असल्याची चर्चा आहे. काहींना महामंडळाचं अध्यक्षपद किंवा राज्यमंत्रीपद मिळू शकतं. ही सर्व चर्चा अंतिम टप्प्यात असून नवरात्रौत्सवा आधी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाच्या घडामोडी घडू शकतात.

नगरसेवकांचा गट फुटणार का?

काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन टायगरचा पहिला अंक पार पडला होता. उद्धव ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार फुटले. एकनाथ शिंदे शिवसेनेची मुंबईच्या महापौरपदावरही नजर आहे. त्यामुळे मुंबईत महापालिकेतील एक मोठा नगरसेवकांचा गट फुटेल अशा सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतात. खासदारांपाठोपाठ आमदार फुटले तर तो उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडू शकतं.

Follow Us
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य