मोठी बातमी! तुकाराम मुंडेंची धडक कारवाई, तब्बल इतके किलो दूध पावडर जप्त, अत्यंत घातक..
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात मोठ्या कारवाया केल्या जात आहेत. भेसळयुक्तांचे धाबे दणाणली आहेत. त्यामध्येच आता धाराशिव जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी कारभार आपल्या हातात घेतल्यापासून मोठ्या कारवाया राज्यभरात होत आहेत. अनेक हॉटेल, रेस्टारंट आणि भेसळयुक्तांविरोधात कारवाई सुरू आहे. या कारवायांचा मोठा धसका लोकांनी घेतला. राज्यातील प्रत्येक शहरामध्ये कारवाई होत आहे. भेसळयुक्तांचे धाबे दणाणली आहेत. या कारवाईदरम्यान तुकाराम मुंडे यांच्या बदलीची जोरदार चर्चा रंगताना दिसली. तुकाराम मुंडे यांच्याकडून आतापर्यंत राज्यातील प्रसिद्ध प्रसिद्ध हॉटेलवर कारवाई करण्यात आली. आता धाराशिवमध्येही तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली. भूममध्ये एफडीएची धडक कारवाई सुरू आहे. 2 लाख 11 हजाराची 1125 किलो दूध पावडर जप्त करण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात अन्न व औषध प्रशासनाने भेसळीविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली. विनापरवाना साठवून ठेवलेली 1125 किलो दूध पावडर जप्त केली आहे. या कारवाईत 61 बॅगमधील सुमारे 2 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या कारवाईने मोठी खळबळ उडाली. ही दूध पावडर बाळासाहेब घोडके यानी विनापरवाना साठवून ठेवण्यात आल्याचे तपासात समोर आले.
याप्रकरणी भूम पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. भूम तालुका खवा, पेढा आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असून भेसळीच्या तक्रारींवरून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील भेसळखोरांचे धाबे दणाणले असून ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याची नागरिकांकडून मागणी केली जात आहे. नाशिकमध्येही अशाचप्रकारची मोठी कारवाई करण्यात आली.
नाशिकमधील प्रसिद्ध हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. तुकाराम मुंडे यांनी आपला मोर्चा दुधात होणाऱ्या भेसळीकडे वळवला आहे. ग्राहकांच्या ताटापर्यंत शुद्ध दूध जाणं हा ग्राहकांचा हक्क असल्याचे तुकाराम मुंडे यांनी म्हटले आहे. भेसळमुक्त दूध ग्राहकांना मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी आता दूध उत्पादक आणि विक्रेत्यांना नवे नियम लागू केले जाणार असल्याचं मुंडे यांनी म्हटले होते.