AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; तीन जण ठार, दहा जखमी

राहुरी तालुक्यातील गुहा फाटा परिसरात भिषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये  तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर दहा जण जखमी झाले. जखमींमधल्या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; तीन जण ठार, दहा जखमी
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 8:13 AM
Share

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील गुहा फाटा परिसरात भिषण अपघात घडला आहे. या अपघातामध्ये  तीन जण जागीच ठार झाले आहेत, तर दहा जण जखमी झाले. जखमींमधल्या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. कंटेनर, जीप आणि दुचाकी एकोंएकांना धडकून हा विचित्र अपघात झाला. या अपघातामधील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तीन वाहनांचा अपघात

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील गृहा फाट्याजवळ नगर-मनमाड महामार्गावर हा भिषण अपघात झाला आहे. कंटेनर, जिप आणि दुचाकी एकोंएकांना धडकून हा अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या अपघातामध्ये जीपमधील तीन जण ठार झाले आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू असून, तीन जणांची प्रकृती  चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अद्याप मृत आणि जखमींची नावे समोर आलेली नाहीयेत.

वाहतूक विस्कळीत

दरम्यान जीप, कंटेनर आणि दुचाकी धडकून हा विचित्र अपघात झाला. या अपघातानंतर काही काळ नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहने घटनास्थळावरून हटवल्यानंतर पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत सुरू झाली. या अपघातामध्ये वाहनांचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या 

निष्काळजीपणा भोवला, एक वर्षाच्या मुलाकडून गोळीबार; वडिलांचा मृत्यू

Yavatmal Crime: सख्या मावस भावंडांचं एकमेकांवर जडलं प्रेम, कुटुंबीयांचा लग्नास नकार; प्रेमी युगुलांनी संपवली जीवनयात्रा

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात घरकाम करणाऱ्या महिलेनंच केलं घर साफ, तब्बल 91 तोळे सोनं चोरून महिलेचा पोबारा

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया,
तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईवर फडणवीसांची स्पष्ट प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार,
KDMC मध्ये अजब प्रकार! पालिका कर्मचाऱ्याचा मराठी बोलण्यास स्पष्ट नकार, चक्क... धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी..
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्रातील बड्या नेत्याकडे मोठी जबाबदारी; थेट...
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... बड्या नेत्याचं विधान
नाही नाही म्हणत असले तरी फडणवीसांना दिल्लीत... पुन्हा बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री?
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत...
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना सूचना
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना महत्त्वाच्या सूचना... मोठी अपडेट समोर
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल: