Ulhasnagar Crime : उल्हासनगरात घरकाम करणाऱ्या महिलेनंच केलं घर साफ, तब्बल 91 तोळे सोनं चोरून महिलेचा पोबारा

तनवाणी कुटुंब जेव्हा बाहेरगाववरुन घरी आले, तेव्हा घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुदैवाने तनवाणी यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता, ज्यात ही महिला चोरी करताना कैद झाली. त्याआधारे तनवाणी यांच्या तक्रारीनुसार उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेचा शोध सुरू केला.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात घरकाम करणाऱ्या महिलेनंच केलं घर साफ, तब्बल 91 तोळे सोनं चोरून महिलेचा पोबारा
उल्हासनगरात घरकाम करणाऱ्या महिलेनं केलं घर साफ
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 11:56 PM

उल्हासनगर : घरकाम करणाऱ्या महिलेनंच घरातील तब्बल 91 तोळे सोनं चोरून पोबारा केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरात घडली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेला आरोपी महिलेला पकडण्यात यश आले आहे. चोरीचा गुन्हा नोंद झाल्यानंतर गुन्हे शाखा महिनाभर या महिलेचा शोध घेत होती. अखेर जंग जंग पछाडत पोलिसांनी महिलेचा शोध घेत तिला बेड्या ठोकल्या आहेत.

उल्हासनगरमधील एका व्यापाऱ्याची घरी केली चोरी

उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे व्यापारी राम तनवाणी यांच्या घरी महिनाभरापूर्वी ही चोरी झाली होती. तनवाणी यांच्या घरी एक महिला आपल्याला कामाची गरज असल्याचं सांगत घरकाम मागण्यासाठी आली होती. तनवाणी यांनी महिलेवर दया दाखवत तिला आपल्या घरी घरकाम करण्यासाठी ठेवून घेतलं. मात्र या महिलेनं घरकाम करता करता घरातील सर्व वस्तूंचे निरीक्षण केले. दागिने कुठे असतात याची माहिती घेतली. आणि एक दिवस तनवाणी यांच्या घराची चावी चोरून नेली होती. महिनाभरापूर्वी राम तनवाणी हे काही कामानिमित्त आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधत या महिलेनं चोरुन नेलेल्या चावीने कुलूप उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातलं तब्बल 91 तोळे सोनं चोरून फरार झाली होती.

तनवाणी कुटुंब बाहेरगावी गेल्याची संधी साधत महिलेने केली चोरी

तनवाणी कुटुंब जेव्हा बाहेरगाववरुन घरी आले, तेव्हा घरी चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुदैवाने तनवाणी यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला होता, ज्यात ही महिला चोरी करताना कैद झाली. त्याआधारे तनवाणी यांच्या तक्रारीनुसार उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेचा शोध सुरू केला. दुसरीकडे उल्हासनगर क्राईम ब्रँचने सुद्धा या महिलेचा माग काढणं सुरू केलं. या महिलेनं तिचं नाव आशा इतकंच सांगितलं होतं. तसेच ही महिला मुलुंडची राहणारी असल्याचं पोलिसांना समजलं. त्याआधारे तिचा शोध सुरू केला असता ती उत्तर प्रदेशातील बुलंद शहर, अहमदाबाद, नाशिक अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली.

मुलुंड येथे सापळा रचून पोलिसांनी महिलेला केले अटक

अखेर ती मुलुंडला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला बेड्या ठोकल्या. तपासात तिचं नाव आशा नसून नर्मदा खान असल्याचं समोर आलं. तिच्याकडून पोलिसांनी 25 तोळे सोनं हस्तगत केलं आहे. दरम्यान, नर्मदा खान हिच्यावर यापूर्वीही अशाच पद्धतीने चोरी केल्याचे तब्बल 12 गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. या गुन्ह्यात महेश शिंदे नावाच्या आणखी एका साथीदाराने या महिलेची मदत केल्याचं समोर आलं असून त्याचा सध्या शोध सुरू असल्याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे. (Jewelery was stolen by a maid in Ulhasnagar)

इतर बातम्या

Mumbai Crime: कांदिवलीत वकिलाच्या बंगल्यात लाखोंची चोरी, चौकीदारच निघाले चोरटे

Jaipur Crime : विवाहित प्रेयसीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होता तरुण, महिलेच्या पतीपासून लपताना पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.