Mumbai Crime: कांदिवलीत वकिलाच्या बंगल्यात लाखोंची चोरी, चौकीदारच निघाले चोरटे

तपासादरम्यान पोलिसांनी काही तांत्रिक गोष्टींचाही अभ्यास केला. पोलीस पथकाने तपासाअंती काही तांत्रिक पुरावे गोळा केले. याच पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलीस पथकाने चारकोप परिसरातूनच आरोपींची गठडी वळली.

Mumbai Crime: कांदिवलीत वकिलाच्या बंगल्यात लाखोंची चोरी, चौकीदारच निघाले चोरटे
कांदिवलीत वकिलाच्या बंगल्यात लाखोंची चोरी
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 11:34 PM

मुंबई : मुंबईतील कांदिवली पश्चिम चारकोप येथे राहणाऱ्या एका प्रसिद्ध वकिलाच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या नेपाळी टोळीतील दोन चोरट्यांना चारकोप पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे. चारकोप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 डिसेंबर रोजी चारकोप येथे राहणारे एक वकील बंगला बंद करून कुटुंबासह बाहेर गेले होते. त्याच दरम्यान, वकिलांच्या बंगल्याजवळच असलेल्या इमारतीत वॉचमन म्हणून काम करणारे दोन वॉचमन आपल्या साथीदारांसह बंगल्याच्या छतावरून आत घुसले आणि लाखोंचा माल चोरून फरार झाले होते.

तांत्रिक पुराव्यावरुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

सदर वकील आपल्या कुटुंबासोबत बाहेर गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते घरी परतले तेव्हा घरी चोरी झाल्याचे उघडकीस आले. वकिलांनी तात्काळ याबाबत चारकोप पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होत तात्काळ प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांनी काही तांत्रिक गोष्टींचाही अभ्यास केला. पोलीस पथकाने तपासाअंती काही तांत्रिक पुरावे गोळा केले. सीसीटीव्ही पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलीस पथकाने चारकोप परिसरातूनच आरोपींची गठडी वळली.

आरोपींकडून चोरीचा माल हस्तगत

जीवन थापा (23) आणि उमेश कुमार सिंग (19) या अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी नेपाळी असून, मुंबईत वॉचमन म्हणून काम करतात. ते जिथे काम करतात त्याच ठिकाणी राहतात, त्यामुळे त्यांना कोणते घर बंद आहे आणि कोणत्या घरात लोक राहतात, याची माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून चोरीचे महागडे घड्याळ, रोख रक्कम, कॅमेरा, इमिटेशन ज्वेलरीसह इतर अनेक मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांनी आतापर्यंत किती चोरी केल्या आहेत, त्यांच्यासोबत किती लोकांचे संबंध आहेत याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (Theft at lawyer’s house in Kandivali, security guard commits theft)

इतर बातम्या

Jaipur Crime : विवाहित प्रेयसीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होता तरुण, महिलेच्या पतीपासून लपताना पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

Sheena Bora Murder Case | अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचं असलेलं शिना बोरा हत्याकांड सोप्पं करुन सांगितलंय, वाचावंच लागेल!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.