Jaipur Crime : विवाहित प्रेयसीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होता तरुण, महिलेच्या पतीपासून लपताना पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

सोमवारी महिलेचा पती राहुल राजपूत तिला शोधत फ्लॅटवर पोहोचला. राहुल आयसाला दरवाजा खोलण्यास सांगू लागला. दरवाजा न खोलल्यास पोलिसांना बोलावण्याची धमकी देऊ लागला. यामुळे आयसा आणि मोहसीन घाबरले. आयसाने मोहसीनला बाल्कनीतील रेलिंगजवळ लपवले.

Jaipur Crime : विवाहित प्रेयसीसोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होता तरुण, महिलेच्या पतीपासून लपताना पाचव्या मजल्यावरुन पडून मृत्यू
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 7:26 PM

जयपूर : विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध आणि लिव्ह-इन-रिलेशनशीप राहणे जयपूरमध्ये एक तरुणाच्या जीवावर बेतले आहे. प्रेयसीच्या पतीपासून लपण्याचा प्रयत्न करताना 29 वर्षीय तरुण पाचव्या मजल्यावरुन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना जयपूरमधील मालवीय नगर येथे घडली. आझम उर्फ मोहसीन असे मयत तरुणाचे नाव असून तो गेल्या सात महिन्यांपासून आयसा नामक विवाहित महिलेसोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहत होता.

मोहसीन प्रेयसीच्या पतीपासून लपण्यासाठी बराच वेळ रेलिंगला लटकला होता. मात्र काही वेळाने त्याचा हात निसटला आणि तो खाली कोसळला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या मोहसीनला उपचारासाठी हॉस्पिटलला नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर मोहसीनची लिव्ह-इन पार्टनर आयसा आणि तिचा पती फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

प्रेयसीच्या पतीपासून लपण्यासाठी रेलिंगला लटकला

मोहसीन आणि आयसा यांची दोन वर्षांपूर्वी नैनितालमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आयसा विवाहित असून तिला एक मुलगी आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध झाल्याने दोघे दोन वर्षांपूर्वी नैनितालमधून पळून जयपूरला आले होते. जयपूरला मालवीय नगरमध्ये गेले सात महिने दोघे लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहतात. नुकतेच 10 दिवसांपूर्वी एनआरआय सर्कलजवळील रिया एम्पायर अपार्टमेंटमध्ये पाचव्या मजल्यावर त्यांनी भाड्याने फ्लॅट घेतला होता.

सोमवारी महिलेचा पती राहुल राजपूत तिला शोधत फ्लॅटवर पोहोचला. राहुल आयसाला दरवाजा खोलण्यास सांगू लागला. दरवाजा न खोलल्यास पोलिसांना बोलावण्याची धमकी देऊ लागला. यामुळे आयसा आणि मोहसीन घाबरले. आयसाने मोहसीनला बाल्कनीतील रेलिंगजवळ लपवले. बराच वेळ लटकल्यानंतर मोहसीनचा हात सुटला आणि तो पाचव्या मजल्यावरुन खाली पडला.

मोहसीन पाच वर्षांपूर्वी घरातून पळून गेला होता

मोहसीन मूळचा उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील रहिवासी आहे. पाच वर्षांपूर्वी काही कारणावरून भावांसोबत त्याचे भांडण झाले होते, त्यानंतर तो घरातून पळून गेला. कुटुंबीयांनी त्याचा खूप शोध घेतला, मात्र त्याचा पत्ता लागला नाही. त्यानंतर तो काही वर्षे दिल्लीत होता. अपार्टमेंटमध्ये त्याने दिल्लीत बनवलेल्या ओळखपत्राची प्रत जमा केली होती. मोहसीनचा चुलत भाऊ अजल याने सांगितले की, अपघातानंतर त्याच्यासोबत असलेली आईसा रुग्णालयातूनच गायब झाली होती. यानंतर ते फ्लॅटवर पोहोचले असता तेथेही सामान गायब असल्याचे आढळून आले. फ्लॅटमधून मौल्यवान वस्तू आणि पैसे घेऊन आयसा पळून गेल्याचा त्यांना संशय आहे.

इतर बातम्या

Sheena Bora Murder Case | अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचं असलेलं शिना बोरा हत्याकांड सोप्पं करुन सांगितलंय, वाचावंच लागेल!

Dombivali Crime: स्कूटीला कट मारली म्हणून रिक्षाचालकास मारहाण, दोघा पिस्तुलधारी आरोपींना अटक

मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.