Yavatmal Crime: सख्या मावस भावंडांचं एकमेकांवर जडलं प्रेम, कुटुंबीयांचा लग्नास नकार; प्रेमी युगुलांनी संपवली जीवनयात्रा

दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र दोघे सख्खे मावस भाऊ-बहिण असल्याने दोघांच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. यामुळेच या दोघांनी विष प्राशन करुन गुरुवारी सकाळी आपली जीवनयात्रा संपवली.

Yavatmal Crime: सख्या मावस भावंडांचं एकमेकांवर जडलं प्रेम, कुटुंबीयांचा लग्नास नकार; प्रेमी युगुलांनी संपवली जीवनयात्रा
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 17, 2021 | 12:22 AM

यवतमाळ : कुटुंबाने लग्नाला नकार दिला म्हणून प्रेमी युगुलाने विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना यवतमाळमध्ये गुरुवारी घडली आहे. विशाल दत्ता आगीरकर आणि पूनम राऊत अशी मयत प्रेमी युगुलांची नावे आहेत. याबाबत पारवा पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.

विशाल आणि पूनम दोघे सख्खे मावस भावंड आहेत. विशाल आर्णी तालुक्यातील राणी धानोडा येथील रहिवासी आहे तर पूनम नांदेड जिल्ह्यातील बोंडगव्हाण येथील रहिवासी आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र दोघे सख्खे मावस भाऊ-बहिण असल्याने दोघांच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. यामुळेच या दोघांनी विष प्राशन करुन गुरुवारी सकाळी आपली जीवनयात्रा संपवली.

कुटुंबीयांचा प्रेमाला विरोध असल्याने केली आत्महत्या

या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्णी तालुक्यातील राणी धानोडा येथील विशाल आगीरकर आणि नांदेड जिल्ह्यातील पुनम राऊत या दोन सख्या मावस बहिण-भावात प्रेमसंबंध जुळले होते. मात्र या दोघांच्या प्रेम विवाहाला कुटुंबीयांतूनच विरोधात होता. त्यामुळे त्या दोघांनी घरून पळून जात पारवा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या सावळी दूरक्षेत्रामधील गूढा येथील गिढाई टेकजीजवळ विष प्राशन करीत जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती गुरूवारी सकाळी उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती कळताच गावातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली.

गूढा गावचे पोलीस पाटील नितीन खोडे यांनी पारवा पोलिसांना याबाबत माहिती दिली. या आत्महत्येचे गांभीर्य लक्षात घेता पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेवून पाहाणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता रूग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार गजानन शेजुलकार, पोलीस कर्मचारी सुरेश येलपूलवार करत आहे. (Couple commits suicide by drinking poison in Yavatmal as family opposes marriage)

इतर बातम्या

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात घरकाम करणाऱ्या महिलेनंच केलं घर साफ, तब्बल 91 तोळे सोनं चोरून महिलेचा पोबारा

Mumbai Crime: कांदिवलीत वकिलाच्या बंगल्यात लाखोंची चोरी, चौकीदारच निघाले चोरटे

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.