VIDEO | बुलडाण्याच्या शासकीय रुग्णालयातील गॅस गळतीची अफवा, रुग्णांची धावपळ

बुलडाण्यातील शेगांवच्या शासकीय रुग्णालयातील गॅस गळतीच्या अफवेने रुग्णांमध्ये एकच धांदल उडाली आहे. (Buldana government hospital Rumors about gas leak rush of patients)

  • Updated On - 5:14 pm, Thu, 24 June 21 Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
VIDEO | बुलडाण्याच्या शासकीय रुग्णालयातील गॅस गळतीची अफवा, रुग्णांची धावपळ


बुलडाणा : बुलडाण्यातील शेगांवच्या शासकीय रुग्णालयातील गॅस गळतीच्या अफवेने रुग्णांमध्ये एकच धांदल उडाली आहे. बुलडाण्याची सईबाई मोटे रुग्णालयात हा सर्व प्रकार घडला आहे. याठिकाणी सेफ्टी वॉलमधून गॅस निघत असल्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. (Buldana government hospital Rumors about gas leak rush of patients)

बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव शहरातील शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन ड्यूरा सिलेंडरमधून अचानक गॅस बाहेर पडत होता. त्यामुळे अनेकांची घाबरगुंडी उडाली. या ठिकाणीही चंद्रपूरसारखी गॅस गळती होते की काय? या भीतीने रुग्णालयातील रुग्ण भयभीत झाले होते. ही घटना काल 23 जूनच्या दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.

सुदैवाने जीवितहानी नाही

बुलडाणा अचानक ऑक्सिजन ड्यूरा सिलेंडरमधून गॅस बाहेर पडत असल्याने भीती निर्माण झाली होती. पण ही गळती ऑक्सिजन ड्यूरा सिलेंडरच्या वॉलमधून निघत असल्याने झाल्याचे सईबाई मोटे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रेमचंद पंडित यांच्याकडून सांगण्यात येत आहे. सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झालेली नाही.  (Buldana government hospital Rumors about gas leak rush of patients)

व्हिडीओ पाहा

संबंधित बातम्या : 

मालेगावात यंत्रमाग उद्योगाला अवकळा; कापडाला मागणीच नसल्याने कारखाने पुन्हा बंद

आदेश झुगारुन धबधब्यावर, पांडवकडा धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू

नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत भाजीपाला स्वस्त, पण स्थानिक बाजारपेठेतील दर चढेच

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI